सोमवार, २२ जुलै, २०२४

शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ रोजी घ्यावयाचे उपक्रम

  

 शिक्षा सप्ताह 

दिवस दुसरा

 मंगळवार दि.२३ जुलै २०२४

 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस



राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः


१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम


२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)


३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य चे विकसन


४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन


५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.


aबोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकर, नअ ध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती.समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.

शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.


सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.

उदिष्टे :


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :


कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणान्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा/परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :


1. निपुण प्रतिज्ञा 

शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.



 /watch ?v=u4R9iLox3ik&t=9s&ab channel- NCERT https://www.youtube.com/watch ?v=u4R9iLox3il OFFICIAL


२. भाषिक व गणितीय खेळ

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.


३. कथाकथन व गणित तज्ञांच्या गोष्टीचे सत्र

वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.


४. लेखन पूर्व व गणनपूर्व कृती

जादुई पिटारा/PSE कीट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.


५. कथाकथन मार्गदर्शन सत्र

वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.

६.गोष्टी वाचन व अभिव्यक्ती

 विद्यार्थ्याना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.


७. खेळाधरित अध्ययन , बाहुलीनाट्य

राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा. पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.


८. कला व हस्तकौशल्य निगडित कृतीचे प्रदर्शन

शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.


९. पायाभूत साक्षरता य संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.


৭.https://www.youtube.com/watch?v=SOzerROJmXq&ab channel-NCE RTOFFICI AL


२.https://www.youtube.com/watch?v=1 HhhPPhQJdA&ab channel=NCE RTOFF ICIAL


१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.


११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.


१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.


समुदायाचा सहभाग :

- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.


- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.






अशा विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस साजरा करावयाचा आहे



शैक्षणिक updates नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या....


धन्यवाद...🙏🙏


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील स्वयंपाकींचे मानधनात वाढ....

 


शालेय शिक्षण विभाग


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील स्वयंपाकींचे मानधन वाढविले


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


सदर योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या रु.२५००/- प्रति महा मानधनामधील राज्य हिस्स्सामध्ये रु.१०००/- प्रति महा इतकी वाढ करुन प्रति महा रु.३५००/- इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी लागणारा एकूण रु.१७५.२० कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे


राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमधील इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व) आहार देण्याचा निर्णय दि. ११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुतप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे.


सदर योजनेंतर्गत तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण रु.६६.६७ कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गतच्या राज्य हिस्स्यामध्ये मंजूर करुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.



स्वयंपाकी मानधनवाढीचे परिपत्रक वाचण्यासाठी Download वर क्लिक करा 


Download


शैक्षणिक updates मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या.....


धन्यवाद....🙏🙏

शनिवार, २० जुलै, २०२४

आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...

 आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...


महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. शिष्यवृ-२०२४/प्र.क्र.२०७/तांशि-४ मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२. दिनांकः १९ जुलै, २०२४.


वाचा:


१) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३३२/ तांशि-४, दि.०७.१०.२०१७.


२) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. ईबीसी-२०१८/प्र.क्र.३८/तांशि-४, दि.१४.०२.२०१८.


३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. शिष्यवृ-२०२४/प्र.क्र.१०५/तांशि-४. दि.०८.०७.२०२४.


शासन परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक


अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे / विहित पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना (मुले व मुली) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु, उपरोक्त वाचा क्र.०३ येथील शासन निर्णयान्वये, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


२. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना ५० टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे. अशा पध्दतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी, असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुध्द कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना वाचा क्र.०२ येथील परिपत्रकान्वये यापूर्वी दिलेल्या आहेत. असे असतानाही राज्यातील काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरत असल्याच्या किंबहुना शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त होत आहेत.


३. वरील पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना, त्यांच्याकडून शिक्षण शुल्क न आकारण्याबाबत शैक्षणिक संस्थांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

१) सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा.


२) शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.


४. आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा.


५. संबंधित संचालनालयाने परीक्षा शुल्काची रक्कम योजनेंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार- संलग्नित बँक खात्यात थेट जमा करावी. तसेच, शिक्षण शुल्काची अनुज्ञेय रक्कम संस्थेच्या बैंक खात्यात थेट जमा करावी. प्रवेशाच्यावेळी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करुन घेतला असल्यास, सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी.


६. वरील सूचना संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व संचालक, कला संचालनालय, मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शिक्षण संस्थांच्या तसेच, विद्यापीठांच्या निदर्शनास आणून, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश द्यावेत. सदर सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना समज द्यावी व आवश्यकता वाटल्यास सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुध्द कारवाई करावी.


७. संबंधित संचालकांनी सदर परिपत्रकास सर्व प्रसिध्दी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिध्दी द्यावी. तसेच, संचालनालयांच्या संकेतस्थळावर हे परिपत्रक प्रसिध्द करावे,


८. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२४०७१९१८५७३३५४०८ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


SHAHAJAHAN SHAKUR MULANI


(शहाजहान मुलाणी) अवर सचिव, महाराष्ट्र शासन






शासन निर्णय PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा




शैक्षणिक updates मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या....

धन्यवाद..🙏🙏



गुरुवार, १८ जुलै, २०२४

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2024 - 25

  "छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती" सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणेबाबत...


संदर्भ :- दिनांक १५/१२/२०२१ सारथी संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतोल ठराव,


उपरोक्त विषयांकित संदर्भान्वये छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित गटातील पात्र इयत्ता ९ वी ते १२ वी साठी अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक/प्राचार्य शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद (सर्व) यांनी सदर अर्जाची छाननी व पडताळणी बाबत आपण आवश्यक कार्यवाही करावी व गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांना आपल्या स्तरावरून कळवावे.


१) इयत्ता ९ वी व १० वी, ११ वी व १२ वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणा-या मराठा, कुणबी, कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व म.न.पा स्तरावर प्रशासनाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करावेत.


२) गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी तालुकास्तरावर अर्जाची संख्या विचारात घेऊन पुरेशा तज्ज्ञ व्यक्तीद्वारा अर्जाची छाननी व पडताळणी करावी. तसेच इयत्ता निहाय दिलेल्या link वर विद्यार्थ्यांच्या बँक तपशिलाची माहिती भरावी.


३) गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी तालुकास्तरावर अर्जाची व सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी व पडताळणी करण्यासाठी माध्यमिक स्तरावरील तज्ञ शिक्षक, अनुभवी मुख्याध्यापकांची मदत घ्यावी व तपासणी अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी स्वाक्षरी करावी.


४) गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर छाननी व पडताळणी केलेले व शिष्यवृत्तीस पात्र असलेले सर्व अर्ज दिनांक ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत योजना शिक्षणाधिकारी यांना सादर करावेत. तदनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची पूर्व कल्पना सर्व संबंधिताना देण्यात यावी.


५) शिक्षणाधिकारी योजना यांनी आपल्या जिल्ह्याचे सर्व अर्ज एकत्रित करून प्रपत्र ख मध्ये जिल्ह्याची माहिती संकलित करावी.


६) शिक्षणाधिकारी योजना यांनी छत्रपती राजाराम महाराज सारवी शिष्यवृत्तीचे इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी व १२ वी चे सर्व अर्ज दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ पर्यंत सह व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बचत गंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावेत.


तालुकास्तरावर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्जाची छाननी व पडताळणी करताना पुढील सूचना गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी विचारात घ्याव्यात.


७) विद्यार्थी ज्या शाळेत / ज्युनियर कॉलेजमध्ये नियमित शिकत आहे तेथूनच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज सादर करावा.


८) NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या


मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्याथ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारची शिष्यवृत्तीस पात्र समजण्यात यावे.


९) इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये ५५% गुणासह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.


१०) इयत्ता ११ वी मध्ये शिकत असेलल्या विद्याथ्यांनी इयत्ता १० वी मध्ये ६०% गुणांसह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.


११) इयत्ता १२ वी मध्ये शिकत असेलल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी मध्ये ५५% गुणांसह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेत गुणपत्रिकेची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे.


१२) National Merit Cum Means Scholarship (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरीट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस स्वीकारू नयेत.


१३) NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्रशासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा (खुला संवर्ग -OPEN), कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी (OBC संवर्ग) या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारावेत.


१४) विद्याथ्यर्थ्यांची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. लिंकवर माहिती भरणे

इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/BZQ5ktjXqTnhBz3v5 ही लिंक आहे.


B) इयत्ता १० वी च्या विद्याथ्यांसाठी https://forms.cle/avQ6gCFYwTsSVitW8 ही लिंक आहे.


C) इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/2TdHYLxminwcga836 ही लिंक आहे.


D) इयत्ता १२ वो च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/yhn3VczUUJP17e/Mm9 ही लिंक आहे.


१५) महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच सदर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना लागू आहे.


१६) खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठीही अपात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्तीस अर्ज स्वीकारु नयेत.


A) विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी,


B) केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,


C) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,


D) शासकीय वसतीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.


E) सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


१७) इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी मध्ये मधील विद्याथ्यर्थ्यांना प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी पालकाचे (आई वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार) पेक्षा कमी असावे, विद्यार्थ्यांनी तहसिलदाराच्या स्वाक्षरीत असलेला चालू आर्थिक वर्षाचा मार्च २०२५ पर्यंत वैध असलेला उत्पन्नाचा दाखला संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. दाखल्याची सत्यप्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी. केंद्र सरकारच्या F. No 1-6-2020-SS Govemment Of India. Ministry Of Education Department Of


School Education & Literacy Shastri Bhawan, New Delhi Dated the 11 March 2022 च्या पत्रान्वये विद्यार्थ्यांच्या


कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ३,५०,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार) इतकी केली आहे. इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्याथ्यांनी सदर शिष्यवृत्तीसाठी चालू आर्थिक वर्षातील पालकांच्या नावे


१८) असलेला दाखला रू. १,५०,०००/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार) पेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसिलदारांच्या स्वाक्षरीतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. हा उत्पन्नाचा दाखला मार्च २०२५ पर्यंत वैध असावा.


१९) छत्रपती राजाराम महाराज सारची शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत खालील क्रमाने कागदपत्रांची छाननी व पडताळणी करावी. A) विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी, इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.


B) मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र. (प्रपत्र क)


C) विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन २०२४-२५ वा सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.


D) विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्यप्रत.


E) विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत (नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.) सदरचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेतील असावे.


F) NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पुढील अटी आहेत. त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यांस सारथी शिष्यवृत्ती योजना लागू राहील. भारत सरकारच्या दिनांक ११ मार्च २०२२ च्या परिपत्रकामध्ये NMMS शिष्यवृत्तीसाठी मुद्दा क्र. २ नुसार अर्हता निश्चित केली आहे ती पुढीलप्रमाणे -


The renewal criteria has been revised from the existing pattern of getting 55% marks


in Class- IX & XI and 60% in Class X to the new pattern of getting minimum of 60 & marks in Class X only for continuation of scholarship (relaxable by 50% for SC/ST candidates) in next higher Classes while getting clear promotion from class IX to class X and from class


XII in the first attempt.


G) NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक / निकालपत्रक साक्षांकित सत्यप्रत जोडावी. H) अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत नोडण्याची आवश्यकता नाही,


२०) गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणी करून तपासणी अधिकारी म्हणून अर्जाची तपासणी झाल्यावर अर्जावर दिलेल्या रकान्यामध्ये नाव व स्वाक्षरी करावी,


२१) काही एकत्रित कुटुंबातील विद्याच्यांचा उत्पन्नाचा दाखला हा आजोबा, काका, आजी, काकी व अन्य नातेवाईकांच्या नावाचा असतो. सदर दाखल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या नावाचा व नात्याचा उल्लेख असावा. केवळ अशा दाखल्या सोबत विद्याथ्यांनी  एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका (रेशन कार्ड) सत्यप्रत अर्जासोबत जोडलेली असावी व इतर विद्यार्थ्यांनी शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही, आई वडील मयत असल्यास, विभक्त असल्यास अनुक्रमे मृत्यू दाखला कोर्ट आदेश प्रत इत्यादीआवश्यक कागदपत्रे सादर करावी.


२२) अर्ज भरताना घ्यावयाची दक्षता विहित नमुन्यात नसलेले अर्ज, लिहिलेल्या अर्जाची झेरॉक्स काढून सादर केलेले अर्ज, ONLINE भरलेल्या माहितीची प्रिंट काढून सादर केलेले अर्ज छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाहीत तसेच अपूर्ण भरलेला अर्ज, विद्याथ्यांची व मुख्याध्यापक/प्राचार्यांची स्वाक्षरी नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, चुकीची माहिती भरलेला अर्ज, अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज, विहित मुदतीत सादर न केलेले अन्य व्यक्तीचे बँक खाते पासबुक सत्यप्रत असल्यास सदर अर्जाची स्वीकृती केली जाणार नाही.


२३) NMMS शिष्यवृत्ती योजना नियमांचा भंग करणे अपात्र विद्यार्थ्यांचे सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवून घेणे, उत्पन्न मर्यादाचे उल्लंघन होणे अन्य संवर्गाचे अर्ज दाखल करून शिष्यवृत्ती मिळविणे बाबत संबधित विद्यार्थी व मुख्याध्यापक, प्राचार्य यांचेवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणेत येईल. यापूर्वी अशी शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्यास परत करावी. याबाबत सह व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बघतगंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ यांना अवगत करावे

 २४) गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांना तालुकास्तरावर अजांची छाननी व पडताळणी करताना काही शंका अडचणी असल्यास ०२३१- २९९२७२३ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामाच्या दिवशी विहित शासकीय कामकाजाच्या वेळेत संपर्क करावा.


२५) गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित अदा करता येईल.


२६) उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत,


उपरोक्त सूचनांचे पालन करून छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज आपण आपला सक्रिय सहभाग दिल्यास समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साह्य करण्यास सारथी संस्थेस सुलभ होईल.


सोबत - छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी व १२ वी अर्जाचा नमुना,
















अधिक माहितीसाठी व परिपत्रक सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 


Download




आणखी अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या eduupdatesms गूगल सर्च करा 


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.....!!




मंगळवार, १६ जुलै, २०२४

MDM पोर्टलवर पटसंख्या अद्ययावत करणे Step by Step माहिती

 *पी.एम पोषण योजना 


MDM Portal वर पटसंख्या(Enrollment) अद्ययावत करणेबाबत 


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत सर्व शाळांनी *MDM Portal वर पटसंख्या अद्ययावत करणेबाबत कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


तरी  MDM Portal वर आपल्या शाळेची पटसंख्या अद्ययावत करनेसाठी पुढील प्रकारे अवलंब करावा....


1)सर्व प्रथम ब्राऊझर ओपन करावे  व setting मध्ये Desktop site वर क्लिक करा व 

https://education.maharashtra.gov.in/mdm

या साईट वर जावे


2) या साईट वर गेल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल



3) या पेज वरील लॉगिन वर क्लिक करा 


3) लॉगिन वर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल. यात शाळेचा युजर आयडी ( U Dise CODE) व password टाकुन Captcha कोड टाका




4) शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या शाळेचे लॉगिन होईल व पुढील पेज ओपन होईल

 या पेज वरील Enrollment या टॅब वर क्लिक करा 

5) या टॅब वर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल
यात आपल्या शाळेचा ईयत्तानिहाय पट संख्या भरा व update या बटण वर क्लिक करा. व शेवटी finalize  टॅब द्वारे माहिती finalize करा

अशा प्रकारे अगदी सहजरित्या आपण आपल्या शाळेची पट संख्या अद्यावत करू शकतो..


शैक्षणिक updates नियमित मिळवण्यासाठी ब्लॉग ला भेट द्या


eduupdatesms हे google search 🔍 करा

धन्यवाद...


बुधवार, १० जुलै, २०२४

शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.


महाराष्ट्र शासन वित्त विभाग


शासन निर्णय क्रमांका मभवा-१३२४/प्र.क्र.०३/सेवा-९


मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक : १० जुलै, २०२४


वाचा भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक: १/१/२०२४-इ.॥ (बी), दिनांक १२ मार्च, २०२४


शासन निर्णय -


राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर ४६% वरुन ५०% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ व्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.


३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.


४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षांखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्थी टाकण्यात यावा.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०७१०१०५२२८९५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे,


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.





Download


महागाई भत्ता शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी लिंक ला टच करा






रविवार, ७ जुलै, २०२४

शाळा सोडल्याचा दाखल्याची ( L. C.) (T. C.) फी किती घेता येते ? द्यावी लागते ? शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय


प्रस्तावना :

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५, दिनांक २६ एप्रिल, २०१५ रोजी प्रख्यापित करण्यात येवून राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर अध्यादेश दिनांक २८ एप्रिल, २०१५ पासून लागू करण्यात आलेला आहे. राज्यातील व्यक्तींना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणाऱ्या लोकसेवा तत्परतेने व पारदर्शकपणे विहीत कालावधीत कार्यक्षमरित्या पुरवावयाच्या आहेत. या विभागामार्फत इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानून त्याला सातत्याने आवश्यक असणाऱ्या सेवा विहीत कालावधीत वाजवी शुल्क आकारुन सोप्या पध्दतीने पुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात विचार करता या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांमधील तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद त्याचप्रमाणे शाळास्तरावरुन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेवांचा विचार करावा लागतो. या सेवा त्यांच्या शैक्षणिक बाबींसाठी किंवा व्यावसायिक आवश्यकता म्हणून त्यांना विहीत कालावधीत पुरवाव्या लागतात, याचा विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद व शाळास्तरावरुन विद्यार्थ्यांना/नागरिकांना पुरवाव्याच्या महत्वाच्या खालील १५ सेवा अध्यादेशाच्या कलम ३ नुसार आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयः

१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रयोजनार्थ या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने व शाळांनी सोबत जोडलेल्या तक्त्यात (प्रपत्र-अ) दर्शविलेल्या त्यांच्याशी संबंधित सेवा विद्यार्थी / नागरिक यांना कालमर्यादा दर्शविलेल्या कालावधीत पुरवावयाच्या आहेत.

२) सर्व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी याबाबत त्यांच्या स्वरावर एक लघुसमिती स्थापन करुन दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या लोकसेवांबाबत आढावा घ्यावा. तसेच अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ यांच्या स्तरावरही या प्रयोजनार्थ आढावा समिती स्थापन करावी. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या सेवांसंदर्भात परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. आयुक्त, शिक्षण हे परिषदेच्या लोकसेवा पुरविण्याविषयी झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेतील. शाळांनी द्यावयाच्या लोकसेवांबाबत शिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती आढावा घेईल, या सेवा सर्व प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक मान्यताप्राप्त शाळांना लागू होतील.

३) तसेच सर्व विभागीय मंडळाच्या कार्यालयात व शिक्षण मंडळाच्या पुणे येथील मुख्यालयात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या कार्यालयात व सर्व शाळामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची माहिती असलेले फलक विद्यार्थी/नागरिक यांच्या माहितीस्तव संपूर्ण तपशीलासह लावण्यात यावेत. तसेच उपलब्ध

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१५/१५५/१५)/समन्वय कक्ष

संकेतस्थळावर देखील यासंदर्भातील संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांस उपलब्ध करावी. तसेच या सेवा टप्प्याटप्याने online करण्यात याव्यात.

सदर शासन निर्णय तात्काळ अंमलात येईल, सदर शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र व मध्ये आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद तसेच शिक्षण मंडळाचे मुख्यालय, विभागीय मंडळांचे पत्ते, दुरध्वनी क्रमांक इत्यादीबाबतची माहिती सर्व सबधिताच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०१०४१५३९५८४१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


वरील शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना वा शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना नेमके कोणते कागदपत्र किती दिवसात व किती शुल्क भरून मिळेल या बाबत विवरण दिलेले आहे ते पुढीलप्रमाणे....





 

वरील संपूर्ण शासन निर्णय परिशिष्टासह PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा

 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गूगल वर सर्च करा eduupdtesms 

 


Thank You 😊

Visit Again 🙏


 


राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision): राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्य...