U Dise Plus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
U Dise Plus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत..

 यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना....

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई


जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक /२०२४-२५/2881 प्रति,


१) आयुक्त,महानगरपालिका, सर्व.

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.


दिनांक: 25 SEP 2024


विषयः यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.


संदर्भ: भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.


उपरोक्त संदर्भिय पत्रान्यये केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे. APAAR आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.


यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR आयडी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.


APAAR आयडी उपयोगिता :-


राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


APAAR आयडी हा १२ अंकी असून एकमेव असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.


यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR आयडी Generate होतील.

APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OoSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील.


APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे. Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.


APAAR आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.


राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.


जबाबदारी :-


महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे Nodal Officer असणार आहेत.


APAAR आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS-Coordinator, जिल्हा स्तरावरील Coordinator यांचे APAAR आयडी Creation बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.


शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना https://apaar.education.gov.in/resource या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.


यु-डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये APAAR आयडी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे.


APAAR आयडी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना APAAR आयडीबाबत संकेत स्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


केंद्र शासनाने APAAR आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी https://apaar.education.gov.in/ हे पोर्टल विकसित केले आहे व १८००-८८९-३५११ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.


(आर. विमला, भा.प्र.से.)

 राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत : माहितीस्तव सविनय सादर, मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


प्रत : उचित कार्यवाहीस्तव -

१) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे 

३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

५) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.





शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी गुगल सर्च करा Eduupdates.Blog


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

 


संदर्भः केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM SHRI या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी १००% विद्यार्थ्यांचे Promotion काम पूर्ण केल्याबदल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन ।


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १,४२,५४७ विद्यार्थ्यांचे Promotion ची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदविली नसल्याचे दिसून आले आहे. तरी सदर माहिती तात्काळ नोदवावी.

सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ७,०५,६०६ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील २७,२८,६५८ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय Student Promotion व Dropbox मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.


इयत्ता १ली व इयता ११वी गध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


तसेच Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.


द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.


आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.


विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.


इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.


मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.


व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.


Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.


शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.


शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

-


मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.


तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे.



(आर. विमला, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत : माहितीस्तव सविनय सादर,


मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


प्रत : उचित कार्यवाहीस्तव,


१) आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


२) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.


३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.


४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.



वरील परिपत्रक संपूर्ण download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या


Thank You


Visit Again 🙏🙏🙏

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision): राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्य...