सोमवार, २२ जुलै, २०२४

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील स्वयंपाकींचे मानधनात वाढ....

 


शालेय शिक्षण विभाग


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील स्वयंपाकींचे मानधन वाढविले


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


सदर योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या रु.२५००/- प्रति महा मानधनामधील राज्य हिस्स्सामध्ये रु.१०००/- प्रति महा इतकी वाढ करुन प्रति महा रु.३५००/- इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी लागणारा एकूण रु.१७५.२० कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे


राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमधील इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व) आहार देण्याचा निर्णय दि. ११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुतप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे.


सदर योजनेंतर्गत तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण रु.६६.६७ कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गतच्या राज्य हिस्स्यामध्ये मंजूर करुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.



स्वयंपाकी मानधनवाढीचे परिपत्रक वाचण्यासाठी Download वर क्लिक करा 


Download


शैक्षणिक updates मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या.....


धन्यवाद....🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत.

 शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत. महा...