महिला कर्मचारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महिला कर्मचारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान  टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ यादरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन लिंक


रजिस्ट्रेशन प्रोसेस -

School Portal वर शाळेच्या लॉगीन ने लॉगीन करा.


यामध्ये

user ID - शाळेचा Udise Number


Password - शाळेचा school  चा पासवर्ड वापरा.


Captcha टाकून लॉगीन व्हा.

लॉगिन झालेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा icon तिथे दिसेल. त्यावर टच करुन मूल्यमापन निकषनुसार आपल्या शाळेची माहिती भरा. 




माहिती भरणे साठी खालील फोटो व कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे आवश्यक आहे.

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे.

📸 वर्ग सजावट फोटो 

📸 वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो

📸इमारतरंगरंगोटी असलेला फोटो

📸बोलक्या भिंती असलेला फोटो 

📸बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो 

📸परसबाग असल्याबाबतचा फोटो

 📸मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो 

📸बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो

 📸नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो

📸विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो 

📸महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो 

📸लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

📸Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो

📸 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो 

📸कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो

 📸शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

 📸आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो

 📸विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो 

📸किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो 

📸 हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो

 📸आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो

 📸कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो 

📸शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो

 📸शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो

 📸प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य विल्हेवाट करतानाचा फोटो 

📸 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.


वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय 1000 अक्षरात विवरण असावे


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesms.Blogspot.com ब्लॉगला भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏




शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबतचा शासन निर्णय

 वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत


महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः वैखप्र-२०२२/प्र.क्र.१७५/राकावि-२ गोकुलदास तेजपाल रूग्णालय प्रशासकीय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४००००१ दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२४


वाचाः- १) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०२२/प्र.क्र. १७५/राकावि-२, दि. १४ डिसेंबर, २०२२ २) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०१७/प्र.क्र.६१४/राकावि-२, दि.०२ ऑगस्ट, २०१९


प्रस्तावना -


"महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील नियम क्र.२ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. सदर नियमातील क्र.२ (३) (तीन) अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये "महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्याची निवड करता येईल अशी तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात सदर बाबत दिनांकासहीत नोंद ठेवणे संदर्भीय दिनांक १४.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक करण्यात आलेले आहे.


दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शासकीय सेवेत नव्याने रुजू होण्याऱ्या महिला शासकीय कर्मचारी यांना विवाहापुर्वी त्यांच्या आई-वडीलांवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे. परंतु काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाहापश्चात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने "आई-वडील" किंवा "सासू-सासरे" या पैकी एकाची निवड करुन तसा विकल्प देवुन त्याची सेवापुस्तकात नोंद घेण्याची तरतुद अवगत नसल्याने, त्यांच्या सेवापुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने "आई-वडील" किंवा "सासू-सासरे" या पैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडुन रुग्णाच्या उपचारादरम्यान वा उपचारानंतर सेवापुस्तकात आई-वडील किंवा सासू- सासरे या पैकी एका विकल्पाची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केली जाते. या सर्व बाबी विचारात घेता, शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात घेता, त्याअनुषंगाने दिनांक १४.१२.२०२२ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करणेबाबत दिनांक १४.१२.२०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सुधारीत आदेश देण्यात येत आहेत.

(१) महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहापश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या "आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या (आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांसह) वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे" असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे. सदर अर्जासोबत संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबुन आहेत, याबाबतचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशनकार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. अविवाहीत महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवापुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही. परंतु, संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहीत असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील.


(२) संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी आई-वडील किंवा सासू-सासरे या पैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करुन संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची (संबंधितांच्या नावासह व) दिनांकासह सेवापुस्तकात आठ दिवसांत नोंद घेणे आवश्यक राहील.


(३) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांने वरील (१) प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजेच महिला कर्मचाऱ्याच्या विवाहापश्चात तिच्या संपूर्ण सेवा कालावधीत तिच्या आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरीता ज्या विवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात आलेली असेल, त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नोंद सेवापुस्तका घेण्याची आवश्यकता नाही.


(४) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी, संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केलेले असेल, त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरील (१) प्रमाणे सेवापुस्तकात विकल्प नोंदविलेला असावा. तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबुन असल्याचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशन कार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) सेवापुस्तकातील विकल्पाच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी जोडणे बंधनकारक राहील.


(५) महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने / बदलीने रुजू होतेवेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त (१) प्रमाणे विहीत केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवापुस्तकात दिनांकासहीत घेण्याची दक्षता घ्यावी.


(६) वरील निर्देशांच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबतचे प्रस्ताव विचारात घेताना, संदर्भीय दिनांक ०२.०८.२०१९ च्या शासन निर्णयान्वये वा त्या-त्या वेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या आई-वडील वा सासू-सासरे यांचे अवलंबित्व ठरविताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदींचे अनुपालन होईल. याची संबंधित कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी.


.हा शासन निर्णय, यापूर्वी विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणांत लागू राहणार नाही, किंवा निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यात येणार नाहीत.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८०१११४९३६३२१७  असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


CHANDRAKANT HARIDAS WADE

(चंद्रकांत ह. वडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन







महिला कर्मचारी वैद्यकीय बिल बाबतचा वरील शासन निर्णय download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 



Download


शैक्षणिक अपडेट्स  मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again...🙏 🙏 

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision): राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्य...