गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची (ग्रॅच्युइटी रक्कम) कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत...

 सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची (ग्रॅच्युइटी रक्कम) कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन 

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: सेनिवे-२०२२/प्र.क्र.८५/सेवा-४ 

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १०.१०.२०२४.

संदर्भ : शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०१९/प्र.क्र.५८/सेवा-४, दि.०१.०३.२०१९.


प्रस्तावना :

महाराष्ट्र शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दि.०१.०१.२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष तसेच दि.०१.०१.२०१६ पासून मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष करण्यात आली आहे.

२. केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु. १४ लाखावरुन रु.२० लाख करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

३. मा. मुख्यमंत्री यांचेसमवेत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या दि.०४.०९.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दि.०१.०९.२०२४ पासून उपदानाची कमाल मर्यादा रु.२० लाख करण्याबाबत सहमती झाली आहे.


शासन निर्णय :

दिनांक ०१.०९.२०२४ पासून सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष पर्यंत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.


२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील.


३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.


४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४१०१०१३०३२७९२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे..


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

MANISHA YUVRAJ KAMTE

(मनिषा यु. कामटे) शासनाचे उपसचिव.


प्रति,

१) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.

२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२. महाराष्ट्र, नागपूर,

३) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.

४) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.

५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई. 

६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.

७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.

 ८) मुख्य लेखा परीक्षा, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.

९) उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.

१०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे / नागपूर/औरंगाबाद / नाशिक.

११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

१२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

१३) मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा / विधानपरिषद,

१४) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.

१५) राज्यपालांचे सचिव.

१६) मुख्यमंत्र्यांचे सचिव.

१७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.

१८) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल न्याय शाखा), मुंबई.

१९) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई. २०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

२१) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

२२)प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

२३) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

२४) मुख्य माहिती महाराष्ट्र, मुंबई. 

२५) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).

२६) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२. 

२७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

२८) सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गहनिर्माण भवन 



सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची (ग्रॅच्युइटी रक्कम) कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Download


ग्रॅच्युटी ( उपदान ) गणना कशी केली जाते..?

खर तर ग्रॅच्युटी (उपदान) हे कोणत्या प्रकारची आहे त्यावरून त्याची गणना वेगवेगळ्या पद्धतीने / नियमानुसार केली जाते..


ग्रॅच्युटी ( Gratuity ) / उपदान चे २ प्रकार आहेत:-

 १.सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity ) आणि

२. मृत्यु उपदान ( Death Gratuity )


१) सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity ) :- 

सेवानिवृत्ती उपदान = अंतिम वेतन ( Basic+ DA) × एकूण सेवा वर्ष × 1/2 

( एकूण सेवा वर्ष हे जास्तीत जास्त 33 वर्ष ग्राह्य आहेत.. )


२) मृत्यु उपदान ( Death Gratuity ) गणना

सेवेत असतांना मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांना ( त्यांच्या कुटूंबास ) मिळणारी ग्रॅच्युटी ची गणना त्यांच्या सेवेनुसार खालीलप्रमाणे मिळते..

1. सेवा 1 वर्षापर्यंत - ग्रॅच्युटी रक्कम अंतिम वेतनाच्या 2 पट ..

2. सेवा 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत - ग्रॅच्युटी रक्कम अंतिम वेतनाच्या 6 पट ..

3. सेवा 5 वर्ष ते 11 वर्षांपर्यंत  - ग्रॅच्युटी रक्कम अंतिम वेतनाच्या 12 पट.. 

4. सेवा 11 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत - ग्रॅच्युटी रक्कम अंतिम वेतनाच्या 20 पट.. 

5. सेवा 20 वर्षांपेक्षा जास्त - ग्रॅच्युटी रक्कम सूत्र पुढीलप्रमाणे..-

अंतिम वेतन × एकूण सेवा वर्ष × 1/2 

(सेवा वर्ष कमाल मर्यादा 33..)

नियमित शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला गुगल सर्च करा Eduupdatesms.Blog


धन्यवाद...🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत.

 शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत. महा...