राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024
राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision):
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (NCF-SE) यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (SCF-SE) विकसित करण्यात येत आहे. हे आपल्या संघराज्यीय रचनेतील राज्यांच्या सक्षमीकरणाशी सुसंगत आहे. शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय असल्याने या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा उद्देश देशातील विविध अभ्यासक्रमांत सुसंवाद आणि समन्वय साधण्यास मदत करणे आहे.
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमान व भविष्यकालीन विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि महत्त्वाकांक्षी, परंतु व्यावहारिकरीत्या अंमलबजावणीयोग्य राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यायोगे वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळेल.
विद्यार्थ्यांना चारित्र्यवान, सुसंघटित, निरोगी, नैतिक, सर्जनशील, तर्कसंगत, संवेदनशील आणि काळजी घेणारी व्यक्ती बनविण्यास सक्षम करणे, तसेच उच्च शिक्षणासाठी लाभदायक व परिपूर्ण रोजगारासाठी तयार करणे हे नवीन अभ्यासक्रमाचे व्यक्तिगत पातळीवर ध्येय असले पाहिजे. या ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी केवळ शिकणे अपेक्षित नसून कसे शिकावे हे शिकणे आवश्यक आहे. जेणेकरून, ते आजीवन अध्ययनार्थी बनू शकतील आणि सतत बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमतादेखील प्राप्त करू शकतील,
आपल्या समाजाचे रूपांतर अधिक न्याय्य, समतावादी, मानवतावादी, समृद्ध, शाश्वत आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेल्या समाजात करणे हे नव्या अभ्यासक्रमाचे व्यक्तिगत पातळीवर ध्येय असले पाहिजे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, संशोधन आणि ज्ञानाची निर्मिती, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता व सांस्कृतिक जतन आणि चैतन्य या बाबतीत जागतिक स्तरावर भारताची कमान उंचावणारे सक्षम नेतृत्व तयार केले पाहिजे.
अभ्यासक्रम आशय:
जगात ज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. माहितीचा विस्फोट, संगणकीय शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे, जगभरातील बऱ्याच नोकऱ्यांवर मूलभूतपणे परिणाम होऊ शकतो. त्यासाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, व्यावसायिक शिक्षण आणि कला या क्षेत्रांमधील बहुशाखीय क्षमता असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, ज्यामध्ये काळजी, संवाद आणि नैतिकतेवर आधारित तर्क यांना अधिक मागणी असेल.
हवामान बदल, पर्यावरणाचा न्हास आणि कमी होत चाललेले नैसर्गिक संसाधने यामुळे पर्यावरणीय शाश्वततेच्या क्षमतेची मागणीही वाढणार आहे, खरेतर, केवळ पर्यावरणीय शाश्वतता यापुढे पुरेशी असू शकत नाही, तर आपली पृथ्वी वाचविण्यासाठी पर्यावरणीय पुनर्स्थापना, पुनरुत्पादन व पुनर्वापर आवश्यक असेल.
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४: (१)
जीवनातील इतर सर्व पैलूंमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तींचे आरोग्य आणि समृद्धी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विषयांचे शिक्षण, तसेच शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि समृद्धी हेदेखील शिक्षण महत्त्वाचे आहे.
या कारणास्तव, विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकला, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, भाषा आणि साहित्य तसेच गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांचा समावेश असलेले बहुआयामी शिक्षण मिळणे खूप महत्त्वाचे आहे; यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व पैलूंचा आणि क्षमतांचा विकास होण्यास मदत होईल आणि शिक्षण अधिक सर्वव्यापी, उपयुक्त, सहभागी आणि अध्ययनार्थीसाठी परिपूर्ण होण्यास मदत होईल.
शालेय वातावरण, पद्धती आणि संस्कृती :
अध्ययन अनुभव हा केवळ अभ्यासक्रमातील आशय आणि अध्यापनशास्त्र यापुरता मर्यादित नसतो, तर तो शालेय वातावरण, पद्धती आणि संस्कृत्ती यावरूनही ठरतो.
शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर शालेय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातून अशा प्रकारचे पोषक शालेय वातावरण आणि संस्कृती विकसित केली जाऊ शकते. जे विद्यार्थ्यांसाठी आदर्श म्हणून काम करू शकतात. शिक्षक आणि इतर कर्मचारी शाळेत सर्वसमावेशक स्वरूपात काळजी घेणे आणि संगोपन करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संबंधित मूल्ये आणि स्वभाववृत्ती विकसित करणे यासाठी मदत करू शकतात, उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिकपणे जाहीर न करणे किंवा प्रदर्शित न करणे, जात, लिंग, धर्म, दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक न देणे, समुदायाची भावना वाढविणे, मुख्य शालेय भाषांपेक्षा वेगळी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बोलीभाषांचा आदर करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे संगोपन व मूल्यमापन करणे, नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करणे व पुनर्वापर करणे, शाळेची इमारत व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवणे इ. गोष्टींमुळे विद्याथ्यांमध्ये संबंधित इच्छित मूल्ये आणि स्वभाववृत्ती विकसित होण्यास मदत होईल. जी केवळ अभ्यासक्रम आशयाद्वारे तितक्या प्रभावीपणे विकसित केली जाऊ शकत नाही.
अभ्यासक्रमातील बदल प्रत्यक्षात आणणे :
अभ्यासक्रमातील बदल प्रत्यक्षात सक्षमपणे प्रतिबिंबित होण्यासाठी, या राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांनी शाळेच्या वास्तविक परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे.
शिक्षक आणि शाळेच्या वास्तविकतेचा लेखाजोखा ठेवणे आवश्यक आहे (उदा. बहुवर्गीय आणि बहुस्तरीय शिक्षण) शिक्षकांनी उपलब्ध संसाधने विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने, सध्याच्या वास्तवातून आदर्शाकडे वास्तववादी मार्ग स्वीकारून स्वतःची क्षमता वाढवावी. सभोवतालची व्यवस्था, शाळा, शालेय संस्कृती, वर्गाचा आकार, विद्यार्थ्यांची सामुदायिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी या घटकांचा विचार करून शिक्षकांनी कार्य करावे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा हा शिक्षणव्यवस्थेतील विविध सहभागी घटक कृती आणि विविध पद्धतींना विचारात घेतो, जेणेकरून त्याची अंमलबजावणी सक्षमपणे होईल. यात केवळ शिक्षकच नव्हे, तर शैक्षणिक प्रशासक, शैक्षणिक सहाय्यक संस्था, शाळा व त्यांचे नेतृत्व आणि विद्याथ्यांची कुटुंबे आणि समाज यांचादेखील सहभाग आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट शालेय शिक्षण व्यवस्थेसमोरील मुख्य समस्या आणि वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी स्पष्टता आणि निःसंकोचपणा बाळगणे हे आहे, त्याशिवाय आमच्या शिक्षक आणि विदयाथ्याँच्या शैक्षणिक जीवनात वास्तविक बदल शक्य होणार नाहीत.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे संघटन:
राज्य अभ्यासक्रम आराखडा हा पाच भागांमध्ये विभागलेला आहे.
भाग अ या भागात शालेय शिक्षणाची व्यापक उद्दिष्टे आणि ती साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छित मूल्ये आणि स्वभाववृत्ती, क्षमता आणि ज्ञान यांची गरज स्पष्ट केली आहे.
भाग ब: काही महत्त्वाच्या आंतरसमवाय क्षेत्रांतील विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. उदा. भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण आणि काळजी, सर्वसमावेशक शिक्षण, मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि शाळांमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर.
भाग क: या प्रत्येक प्रकरणात शालेय शिक्षणाच्या सर्व संबंधित स्तरांसाठी परिभाषित अध्ययनाची मानके आहेत. आशयाची निवड, अध्यापनशास्त्र आणि त्या विषयासाठी योग्य मूल्यांकनासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या भागामध्ये इयत्ता तिसरी ते दहावी, अकरावी आणि बारावीच्या विषयांच्यामांडणीवर आणि श्रेणीवर एक प्रकरण आहे.
भाग ड: या भागात शालेय संस्कृती आणि प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले आहे, जे सकारात्मक शैक्षणिक वातावरण सक्षम करण्यासाठी इच्छित मूल्ये आणि स्वभाववृत्ती जोपासतात.
भाग इ: हा या आराखड्याचा शेवटचा भाग आहे. यात शालेय शिक्षणाच्या एकंदर परिसंस्थेच्या आवश्यकतेची रूपरेषा दिली आहे. ती राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास सक्षम असेल. यामध्ये शिक्षकांची क्षमता, भौतिक पायाभूत सुविधांची गरज, समुदाय आणि कुटुंबाचीभूमिका या घटकांचा समावेश आहे.
CBSE व अन्य शिक्षण मंडळांच्या शाळांची कार्यपद्धती व वेळेचे वार्षिक नियोजन :
अ) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ मध्ये अपेक्षिलेल्या अध्यापन कालावधीचे अनुषंगाने पूर्तता होणेसाठी, वर्षभरामध्ये उपलब्ध होणाऱ्या वेळेचा पुरेपूर वापर करून विद्याथ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ब) CBSE तसेच अन्य काही मंडळांशी संलग्न शाळांचे नवीन वर्ष साधारणपणे १ एप्रिल रोजी सुरू होते व ३१ मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालाने समाप्त होते. सदर शाळांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी (मे महिन्यामध्ये) व सत्र समाप्तीनंतर अथवा राष्ट्रीय सण समारंभांचे अनुषंगाने काही दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या दिल्या जातात. मे महिन्यातील सुट्टीनंतर सदर शाळा साधारणपणे १ जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात. विद्यार्थ्यांना खूप दीर्घ सुट्ट्या न देता अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व उपक्रम शाळेमध्येच सरू ठेवले जातात.यामुळे CBSE संलग्न शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून येते.
क) CBSE संलग्न शाळा भारतभर तसेच भारताबाहेरही सुरू आहेत. याचा अर्थ उत्तर भारतातील अति थंड/अति उष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये तसेच अतिवृष्टी प्रवणक्षेत्रांमध्ये येणाऱ्या अशा सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक साधारणपणे वरीलप्रमाणे समान असलेचे दिसून येते.
४.२.२ राज्यातील राज्यमंडळाशी संलग्न शाळांसाठी शैक्षणिक वर्ष व कामकाजाच्या वेळा.
अ) स्पर्धेच्या युगात वाढत राहणाऱ्या अभ्यासक्रमाचा कार्यभार पूर्ण करण्यासाठी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धां सक्षम करण्यासाठी CBSE प्रमाणे उपक्रम राबविणे तसेच वार्षिक वेळापत्रकात सुधारणा करून उपलब्ध वेळेचा सुयोग्य उपयोग करणे संयुक्तिक ठरणार आहे. सबब राज्यातील शाळांसाठी पुढीलप्रमाणे वार्षिक वेळापत्रक असेल.
ब) CBSE मंडळाचा अभ्यासक्रम /पाठ्यक्रम बहुतांश स्वीकारण्यात येत असल्याने शाळांचे वार्षिक वेळापत्रकही CBSE मंडळाप्रमाणे ठेवण्यात येईल.
क) राज्यातील पूर्णवेळ शाळा सदयः स्थितीत साधारणपणे सहा ते साडेसहा तास भरतात आणि दैनंदिन चार ते साडेचार तास अध्यापनाचे असतात. अनेक (शाळा इमारत अपूरी व विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे) दोन सत्रांमध्ये चालवाव्या लागतात. सदर शाळांना उपलब्ध होणाऱ्या वेळेचाही विचार करावा लागणार आहे. अशा दोन सत्रातील शाळांना जास्तीत जास्त साडेपाच तास उपलब्ध असतात आणि त्यामधील अध्यापनासाठी साधारणपणे साडेचार तास मिळतात.
ड) राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) नुसार दैनंदिन पाच ते साडेसहा तास अध्यापन होणे आवश्यक केलेले आहे तथापि सदर बाबींची पूर्तता सर्व प्रकारच्या शाळांमध्ये होणे कठीण आहे. शाळांना दैनंदिन कामकाजासाठी वेळ कमी मिळत असल्यामुळे, अशा शाळा जास्त दिवस चालू ठेवून सदर कालावधी वर्षभरात भरून काढता येईल.
इ) उक्त बाबी विचारात घेता वर्षभरात अभ्यासक्रमाचा कार्यभार प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वरीलप्रमाणे वार्षिक वेळापत्रक लागू करणे आवश्यक आहे.
फ) राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) नुसार शाळांसाठी आवश्यक कामकाज कालावधी तसेच राष्ट्रीय श्रेयांकन आराखडा National Credit Framework (NCF) नुसार विहित श्रेयांक (Credit) पातळी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्ययन कालावधी पुरेसा उपलबध करणे आवश्यक असेल. या दोन्ही दस्तऐवजांमधील निकषांनुसार पूर्वतयारी स्तरासाठी वार्षिक १००० तास आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरासाठी वार्षिक १२०० तास अध्ययन होणे आवश्यक केलेले आहे. अशा बाबींची पूर्तता होणेसाठी वरीलप्रमाणे वार्षिक वेळापत्रक लागू करणे क्रमप्राप्त आहे.
![]() |
राज्य अभ्यासक्रम आराखडा संपूर्ण download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या
गुगल सर्च करा Eduupdates.Blog