गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेरमेडीकल तपासणी करून खोटया प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत....

दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेरमेडीकल तपासणी करून खोटया प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत....



महाराष्ट्र शासन

 दिव्यांग कल्याण आयुक्तालय, 

३ चर्चपथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११ ००१.

दूरध्वनी क्र. ०२०-२६१३६८४५

फॅक्स क्र. ०२०-२६१११५

ईमेल - commissioner.disability@maharashtra.gov.in

क्र.दिकआ/प्र-७/दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणी/२०२४-२५/पुणे.

प्रति,

जिल्हाधिकारी (सर्व), जिल्हाधिकारी कार्यालय.


दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेरमेडीकल तपासणी करून खोटया प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत....


संदर्भ :- १) मा.श्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू मंत्रीदर्जा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियान महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र यांचे पत्र दिनांक ०७.०८.२०२४.

२) स्टुडंटस राईटस् असोसिएशन यांचे पत्र दि. ०५.०८.२०२४

३) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दि. १४.०९.२०१८.

४) आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. आसेआ/कक्ष-३टे- १०/दिव्यांग प्रमाणपत्र / पडताळणी/१५७२३-२४/२४ दि. २१.०८.२०२४.

५) मा.श्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू मंत्रीदर्जा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियान महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र यांचे पत्र दिनांक १६.०८.२०२४.


महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की, राज्यात मोठया प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेवुन बरेच उमेदवार शासकीय, निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत. सदर दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे, या करिता दि. १९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान" राबविले होते. सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस प्रमाणपत्र धारक एकूण ३५९ उमेदवारांची नावे निदर्शनास आलेली आहेत. सदर संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणे आवश्यक आहे. असे नमुद करुन सदर यादीतील उमेदवारांची दिव्यांगत्व व प्रमाणपत्र पुनर्तपासणी करून त्याची पडताळणी करण्यात यावी. व बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी संदर्भ क्र. १ व २ मध्ये नमुद पत्रान्वये करण्यात आलेली आहे.

संदर्भ क्र. ३ मध्ये नमुद सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दि. १४.०९.२०१८ अन्वये दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ५९ च्या अधिन राहुन सदर शासन निर्णयातील मुद्या क्र. (ग) मध्ये तक्रार अपिल व निर्देशी मंडळ याबाबत तरतूद नमुद आहे.


संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद पत्रान्वये आयुक्त आरोग्य सेवा यांनी संदर्भ क्र. १ व २ सोबत सादर केलेल्या यादीमधील विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस प्रमाणपत्र धारक ३५९ दिव्यांग कर्मचारी यांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दिनांक १४.०९.२०१८ मधील मुद्दा क्रमांक (ग) मध्ये अपिल निर्देशी मंडळ यांच्याकडे फेरतपासणी करता येईल असे कळविले आहे.


मा. श्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू मंत्रीदर्जा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियान महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र यांनी त्यांच्या संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये दि. ०७.०८.२०२४ रोजीच्या पत्रासोबत संशयीत उमेदवारांच्या यादीमध्ये नमूद उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करुन जे उमेदवार बोगस आढळतील त्यांच्यावर १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याबाबत विनंती केली असुन तपासणी अंती बोगस आढळलेल्या दिव्यांग उमेदवारांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेला आहे.


त्यानुसार सदर यादीमध्ये नमूद आपल्या जिल्हयातील कार्यरत दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दिनांक १४.०९.२०१८ मधील मुद्दा क्रमांक (ग) मध्ये नमूद संबंधित अपिल निर्देशी मंडळ यांच्याकडे करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ निर्देश देण्यात यावेत. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास देखील अवगत करण्यात यावे. (सोबत या कार्यालयास प्राप्त दिव्यांग कर्मचारी यांची एकत्रित यादी)


आपला विश्वासू

Signed by

Pravin Kundlik Puri 

Date: 25-08-2024 20:47:22

 (प्रवीण पुरी, भा.प्र.से.)

आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य


प्रत माहितीस्तव-

१. मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई.

२. मा. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई

मा. सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, ३ रा मजला, ए विंग, मित्तल टॉवर्स, नरीमन पॉईट, मुंबई.

३.मा. श्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू मंत्रीदर्जा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी

४. अभियान महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर यांचे स्वीय सहाय्यकः-


उपरोक्त संदभांकित आपल्या पत्रासह या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यादीबाबत उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून सदर यादीमध्ये नमूद उमेदवारांच्या नियुकती प्राधिकाऱ्यांबाबत काही तपशील आपल्याकडे उपलब्ध असल्यास सदर तपशील संबंधित यांना उपलब्ध करून देण्यात यावा.

५. आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई.

६. आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई.

७. स्टुडंटस राईटस् असोसिएशन, १५५२, अभियान सोसायटी, सदाशिव पेठ, पुणे ३०.


ई मेल- (mpsestudentsrights@gmail.com) उपरोक्त संदर्भाकित आपल्या पत्रासह या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यादीबाबत उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असुन सदर यादीमध्ये नमूद उमेदवारांच्या नियुकती प्राधिकाऱ्यांबाबत काही तपशील आपल्याकडे उपलब्ध असल्यास सदर तपशील संबंधित जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात यावा.


(प्रवीण पुरी, भा.प्र.से.)

आयुक्त,

दिव्यांग कल्याण आयुक्तालय,

महाराष्ट्र राज्य





शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी गुगल सर्च करा Eduupdatesms.Blog


Thank You...


Visit Again 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत.

 शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत. महा...