शिक्षा सप्ताह - शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
दिवस सातवा
28 जुलै 2024- समुदाय सहभाग दिवस
शाळेत घ्यावयाचे उपक्रम
विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.
प्राचार्य/ शिक्षक/ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांना कृतज्ञता पत्रे लिहावीत
"स्वयंसेवक बनो अभियान"
सामुदायिक रेडिओ स्टेशन्स/ सोशल मीडिया/ PMeVidya चॅनेल/ व्हर्च्युअल क्लासरूम इत्यादींद्वारे विद्यांजलीबद्दल जनजागृती करणे.
शाळांमधील "वॉल ऑफ फेम/ नोटिस बोर्ड" वर सक्रिय स्वयंसेवकांची नावे लिहा.
समुदाय जागरूकता
(समुदाय सेटिंगमधील रॅली/ रॅली/ रॅली/ पोस्टर मेकिंग/ विद्यांजलीचा लोगो/ स्वयंसेवक उपक्रमांवर चार्ट बनवणे)
विद्यांजली कार्यक्रमाविषयी सकाळच्या संमेलनात शिक्षक/ विद्यार्थी/ DIET चे संभाषण
उपक्रमाविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करु शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.
उद्दिष्टे -
1. शाळांचे सक्षमीकरण करणे.
2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय
3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे.
विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.
2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.
3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
4. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.
6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे
7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.
8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.
अपेक्षित परिणाम -
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल
2. शाळांचे सक्षमीकरण होईल.
3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.
शैक्षणीक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या.....
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.....
Visit Again... 🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा