मंगळवार, ३० जुलै, २०२४

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४


विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४


भाग एक रतलेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता पूर्ण शिक्षणा करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या ध्येय, धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी, पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६.०७.२०२४ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट-२०२४ मध्ये "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सर्व योजनांची अंमलबजावणी होते काय, तसेच अंमलबजावणीमध्ये येणा-या अडवायांचा विचार करुन, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" अंतर्गत दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या कालावधीदरम्यान परिशिष्ट-अ मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावयाचे आहे व अहवाल सादर करावयाचे आहेत. अभियानाची कार्यदिशा :-


१. अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे, तद्नंतरच्या ०६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा/ उपायोजना करणे, तदनंतरच्या ०४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.


२. आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यलयीन कामकाज करणे, उर्वरित तीन/चार दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे. अ.क्र.१ मध्ये नमूद प्रमाणे कार्यवाही करणे.


३. सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख/गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी/प्राचार्य/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येषा शाळांना भेटी/निरीक्षण अहवाल लॉगीन मधून दररोज अद्यावत करणे.


वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातौल सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दीष्ट ठरवून द्यावे. संबंधितांनी वरील मुद्दयांवर प्रभावी निरीक्षण करुन बिनचूक माहिती संकलित करावी. त्यांचे लगतचे पर्यवेक्षीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दीष्टांव्यतिरिक्त त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी. यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहचत आहे काय याची खातरजमा होणे आवश्यक आहे.


भाग दोन:-


पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच विविध मा. लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयांकडे निवेदने/अर्ज प्राप्त होत असतात. अशा अर्जावर / निवेदनांवर वेळेत कार्यवाही होण्यास्तव विभागाने २५० पेक्षा जास्त सेवा "लोकसेवा हमी कायद्यांतर्गत घोषित केलेल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त ब-याच सेवा विभागामार्फत सर्वच स्तरावर देण्यात येतात. या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहीत वेळेत मिळाव्यात असे अपेक्षीत आहे.


या करीता दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा. यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यासनाच्या कार्यविवरण पंजी (वर्कशीट) नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा. त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट-व मध्ये ठेवण्यात याव्यात, वेळोवेळी नजीकच्या संनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करावे.


वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रीय सहभाग घेउन यशस्वीरीत्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टामधील माहिती उपसंचालक व संचालक यांनी नियमित संकलित कराची. याबाबत सप्टेंचर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण), मा.प्रधान सचिव (शालेय शिक्षण) व आयुक्त (शालेय शिक्षण) क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार आहेत, याची नोंद घ्यावी.


अभियानातील निरीक्षणाचे मुद्ये

१)शैक्षणिक गुणवत्ता PAT, PGI, NAS, ASER, जिल्हा स्वास्थ्य पत्रिका नूसार करण्यात आलेल्या उपाययोजना


२)इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती

इयत्ता १

इयत्ता २

इयत्ता ३

इयत्ता ४

इयत्ता ५

इयत्ता ६

इयत्ता ७

इयत्ता ८

इयत्ता ९

इयत्ता १०

इयत्ता ११

इयत्ता १२


३)गणवेश सन २०२४-२५ उपलब्धता


४)प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतंर्गत भोजन उपलब्धता / दर्जा / परसबाग विकास स्थिती/ स्वयंपाकगृह उपलब्धता, इ.


५)स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन


६)विविध संस्थानी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अमलबजावणी स्थिती


७)वर्ग खोल्यांची स्थिती


८)स्वच्छतागृह उपलब्धता


९)स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अमलबजावणी


१०)अध्ययन-अध्यापन साहित्याची उपलब्धता/ई- अध्ययन


११)शाळांमध्ये इंटरनेट सुविधा


१२)दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिली


१३)पाठ्यपुस्तकातील को-या पानांचा प्रभावी उपयोग


१४)विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी


१५ आनंददायौ शनिवार अमलबजावणी


१६)शाळांची वेळ ठरविण्या बाबतची स्थिती








संपूर्ण परिपत्रक download करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा..


Download


शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित ब्लॉगला भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again.... 🙏🙏

सोमवार, २९ जुलै, २०२४

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 राबविणे

 

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.


या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.


उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.


अभियानाचा कालावधीः-


i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.


ii) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.


दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि.१५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.


iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.




मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 शाळा नोंदणी लिंक 👇

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन लिंक



माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 गुणदान तक्ता  डाऊनलोड करा 👇

माझी शाळा सुंदर शाळा गुणदान तक्ता


माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 शासन निर्णय 👇

Download



शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या...


Thank You.....


Visit Again 🙏🙏


शनिवार, २७ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह सातवा दिवस अंतर्गत शाळेत घ्यावयाचे उपक्रम

 शिक्षा सप्ताह - शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

दिवस सातवा

28 जुलै 2024- समुदाय सहभाग दिवस


शाळेत घ्यावयाचे उपक्रम 

 वि‌द्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.


प्राचार्य/ शिक्षक/ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांना कृतज्ञता पत्रे लिहावीत


"स्वयंसेवक बनो अभियान"


सामुदायिक रेडिओ स्टेशन्स/ सोशल मीडिया/ PMeVidya चॅनेल/ व्हर्च्युअल क्लासरूम इत्यादींद्वारे विद्यांजलीबद्दल जनजागृती करणे.


शाळांमधील "वॉल ऑफ फेम/ नोटिस बोर्ड" वर सक्रिय स्वयंसेवकांची नावे लिहा.


समुदाय जागरूकता


(समुदाय सेटिंगमधील रॅली/ रॅली/ रॅली/ पोस्टर मेकिंग/ विद्यांजलीचा लोगो/ स्वयंसेवक उपक्रमांवर चार्ट बनवणे)


विद्यांजली कार्यक्रमाविषयी सकाळच्या संमेलनात शिक्षक/ विद्यार्थी/ DIET चे संभाषण


उपक्रमाविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागा‌द्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. वि‌द्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी वि‌द्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करु शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.


उद्दिष्टे -

1. शाळांचे सक्षमीकरण करणे.

2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय

3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे.


विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.


1. वि‌द्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.


2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.


3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वि‌द्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.


4. वि‌द्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.


6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे

7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.


8. शालेय स्तरावर वि‌द्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.


अपेक्षित परिणाम -


1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल

2. शाळांचे सक्षमीकरण होईल.

3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.





शैक्षणीक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या.....

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.....


Visit Again... 🙏🙏

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह अंतर्गत सहावा दिवस Eco Club करावयाचे उपक्रम


शिक्षा सप्ताह, 

दिवस सहावा 

वार शनिवार दि. २७/०७/२०२४


Eco clubs for Mission LIFE Day

करावयाचा उपक्रम -

शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे 

आणि #Plant4 Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.


अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत #Plant4Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना


वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.


विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग:- विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.


नावांचे फलक लावणे : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.


रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे: विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यामध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.


वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत. https://docs.google.com/spreadsheets/d/13mep-nPOg8gmyX5HR4D1Swob OztSgb15eQRBNrFMwo/edit?gid=15896978#gid=15896978

२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संभाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4Mother आणि # एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत


.ब) शाळांमध्ये मिशन लाइफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना


शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते. इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील, पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी.


मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापनाः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी.


• नेतृत्व :- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाइफसाठी इको क्लबचे प्रमुख / मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील.


समन्वयकाची जबाबदारी:- मिशन लाइफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक (PGT) किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) यांची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.


मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-

> इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.

> मिशन लाइफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल

> शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.

> ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी.

> इको क्लव अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे.






शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित ब्लॉगला भेट द्या....


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again....🙏🙏

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.

 राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२


दिनांक:- २६ जुलै, २०२४


वाचाः- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३


प्रस्तावना :-


संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.


या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.


उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.


शासन निर्णयः-


१. अभियानाची व्याप्ती-:


i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.

ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.


सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.

शासन निर्णय क्रमांकः मुर्मअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६


२. अभियानाची उद्दिष्टे :-


1) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.


ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.


iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.


३. अभियानाचा कालावधीः-


i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.


ii) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.


दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि.१५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.


iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.


४. अभियानाचे स्वरूपः-


४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे


गुणांकन देण्यात येईल.


अ) पायाभूत सुविधा ३३ गुण


ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण


क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण


खर्च विवरण -

अ.क्र. १ येथील खर्चासाठी केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, महानगरपालिका क्षेत्र स्तर तसेच राज्यस्तर यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


उपरोक्त तक्त्यातील अ.क्र. १ व २ येथील खर्चाच्या रकमामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


खर्चाची रकम संबंधितांना प्रदान करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्याचे अधिकार देखील आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


अभियानाचा एकूण अपेक्षित खर्च (I)+(II)+(III)+(IV)+(V) = रु.८६७२.०० लक्ष


४.५ स्तरनिहाय व वर्गवारीनिहाय प्रत्यक्ष स्पर्धा :-


४.५.१ बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावरील :-


बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत १९ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दोन जिल्ह्यामधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व


तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


४.५.२ वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र :-


वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिका अंतर्गत १६ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु. ३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


४.५.३ उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र :-


तालुकास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


जिल्हास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


विभागस्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.


४.५.४ राज्य स्तरावरील स्पर्धा :-


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा, अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे रु.५१.०० लक्ष, ३१.०० लक्ष व २१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.


४.६ जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग :-


कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.


५. पारितोषिकाच्या रकमेसह अभियानासाठी एकूण खर्च अंदाजे रु.८६.७२ कोटी इतक्या खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानाचा प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे सदर समितीची जबाबदारी असेल. यासाठी रु.१२.९० कोटी इतका निधी आयुक्त (शिक्षण) यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर निधी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून खर्च करण्यास ते सक्षम असतील.


७. या प्रीत्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांकई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, १०१, शासकीय प्राथमिक शिक्षण, (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२) ५०-इतर खर्च या लेखाशीर्षाखालील सन २०२४-२५ या चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.


८. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग भाग-३, अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तथा शासनाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.


९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७२६१६४५१२१९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


TUSHAR VASANT MAHAJAN


( तुषार महाजन ) उप सचिव, महाराष्ट्र शासन


















माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 चा संपूर्ण शासन निर्णय download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Download


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या...



Thank you....


Visit Again... 🙏🙏

गुरुवार, २५ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह दिवस पाचवा कौशल्य दिवस उपक्रम


शिक्षण सप्ताह

दिवस पाचवा

शुक्रवार दि. २६ जुलै २०२४

कौशल्य दिवस


सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण


शाळेत घ्यावयाचे उपक्रम -

1) संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (marketing) यांची ओळख

2) सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती

3) निसर्ग व शेतीतून अध्ययन

4) घरगुती कामातून शिकणे

5) हॅकेथॉन उपक्रम

6) मातीकाम कौशल्य

7) बांबू कला कार्यशाळा

8) पिशवी निर्मिती कार्यशाळा

9) व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट

10) प्रथमोपचार कार्यशाळा


या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 

प्रस्तावना

शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहे. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डीजीटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे २१ व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो.


कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते, त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते, उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यामधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात.


पार्श्वभूमी

भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्वावर भर देण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.


याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

१) जागृकता वाढविणे यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्ये याबाबत माहिती द्यावयाची आहे.

२) सेतू निर्माण करणे - शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक, संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे

३) आवड निर्माण करणे पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे यात अभिप्रेत आहे.

४) यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या - विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे.


कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत अयोजन करता येईल.-

 खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल.


१) संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (marketing) यांची ओळख -

उपक्रम - भूमिकाभिनय


विद्यार्थी कृतीः यांतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण यासंदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील.


ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण

१) यात अभिरूप वातावरणात विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेबबात माहिती सांगतील

२) सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील.

३) ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिट्य सांगतील


आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे -

१) विद्यार्थी ग्राहकांचे आक्षेप अभिरूप वातावरणात आत्मविश्वासपूर्वक हाताळतील

२) ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याच्या तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील.


* ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन

१) विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र, मानसशास्त्र, वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा लक्ष्य गट निश्चित करतील

२) विद्यार्थी ग्राहकांची प्राधान्ये, स्पर्धकांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करतील.


मॉक मार्केटिंग कॅम्पेन डेवलपमेंट


१) विद्यार्थी शाळेतील उपक्रम, कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेत सहभागी होतील

२) पोस्टर्स, फ्लायर्स, मिडिया पोस्ट्स यासारखी प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील

३) लक्ष्यगट ग्राहकांना आकर्षित करण्यास व खरेदीप्रक्रियेत गुंतवून ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणाची आखणी विद्यार्थी करतील


२) सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती


उपक्रम-ऐतिहासिक स्थळाला भेट


कौशल्य -ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण व विश्लेषण विद्यार्थी कृतीः


१) या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तुबद्दलचा संपन्न वारसा, व विशिष्ट संसृतिक महत्व याब्त माहिती घेतील


२) विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील.


३) यात विद्यार्थी त्या वास्तूचा इतिहास, ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्ये याबाबत माहिती घेतील


४) विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास, संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करतील


५) ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्व, त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्व, समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील


६) विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील


७) विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील


८) स्थानिक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान, त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्व समजून घेतील

९) इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मुल्ये व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील


३) निसर्ग व शेतीतून अध्ययन


उपक्रम- सेंद्रिय शेती, बागायती रोपवाटिका, कृशिबजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या उपक्रमांचा समावेश यात करता येईल.


कौशल्य : पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जन शीलता


विद्यार्थी कृतीः


१) विद्यार्थी या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्तीसाठी भेट देतील


२) विविध वनस्पती, प्राणी, विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील


३) विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील .


४) फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे वर्गीकरण करतील


४) घरगुती कामातून शिकणे


उपक्रम - स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम


कौशल्य-नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज स्वयंपाक


१) विद्यार्थी स्वयंपाकातील एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पाक कृती, त्यादरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम, स्वच्छता याबाबत माहिती सांगतील.


२) साफसफाई व स्वच्छता विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व विशद करतील, याबाबत - शालेय, वर्ग स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतील.

३) बागकाम विद्यार्थी, विविध वृक्षांची लागवड, त्याची काळजी, संगोपन, पर्यावरणीय घटकांचा वनस्पतीवर होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील


५) हॅकेथॉन-उपक्रम- कोडींग स्पर्धा


कौशल्य - समस्या निराकरण, प्रोग्रामिंग, संगणीकरण


विद्यार्थी कृतीः


१) विद्यार्थी गटामध्ये कोडींग स्पर्धा किंवा अप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील.


२) प्रकल्पाचे सादरीकरण करतील


) प्रसार माध्यम आणि करमणूक-उपक्रम - अॅनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे.


कौशल्य- संगणकीय विचार, कथा सांगणे, डीजीटल साक्षरता


विद्यार्थी कृतीः


१) विद्यार्थी स्क्रॅच या अप्लीकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील.


२) या उपक्रमातून विद्यार्थी कोडींग व अॅनिमेशनचे मुलभूत घटक शिकतील


७) डिझाईन उपक्रम- डिझाईन थिंकिंग कार्यशाळा


कौशल्य- सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण


विद्यार्थी कृतीः

१) या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग इतर उपक्रम राबविण्यासाठी कसा उपयोग होईल याचा विचार करतील.

२) शालेय उपहार गृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील.


३) यांसारख्या उपक्रमाचा यात सहभाग करता येईल.


(विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना, सुधा मूर्ती यांची पुस्तके, रीडर्स


डायजेस्ट इ. यासारख्या पुस्तकांचे वाचन करून out of box विचार करू शकतील).


८) मातीकाम कौशल्य उपक्रम - मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे.


कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी.


विद्यार्थी कृतीः

१) विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास व महत्व याची माहिती घेतील. 

२) मातीपासून विविध वस्तू उदा. वाट्या, फुलदाणी तयार करतील.


९) बांबू कला कार्यशाळा- उपक्रम - बांबू हस्तकला


कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण जागरूकता इत्यादी.


विद्यार्थी कृतीः

A) बांबू क्राफ्ट तंत्र

१)) आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे, आकार देणे आणि जोडणे यांच्या पारंपारिक पद्धतीचा वापर करावयास शिकतील


२) यासाठी चाकू किंवा करवत याचा वापर व त्या दरम्यानची सुरक्षितता यांचे पालन करतील.


३) बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील


.B) बांबू हस्तकला प्रकल्प


१) यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट, फुलदाण्या, पेन स्टँड यासारख्या वस्तू तयार करतील.


२) या वस्तूंना आकर्षक करण्यासाठी रंगवणे, सजवणे इत्यादीसारख्या विविध तंत्राचा शोध घेतील.


३) बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभाग घेतील.


१०) पिशवी निर्मिती कार्यशाळा-उपक्रम - चिंध्या पासून पिशव्या बनवणे.


कौशल्य- शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता.


विद्यार्थी कृतीः

१) या कार्याशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरोपयोगी कपड्यांपासून पिशव्या तयार करणेबाबत माहिती दिली जाईल.


२) या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, तंत्र, विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती होईल.


३) विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशवी तयार करतील.


११) सुरक्षित पाणी पक्रम- पाणी चाचणी कार्यशाळा.


कौशल्य- वैद्यानिक दृष्टीकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार.


विद्यार्थी कृतीः

१) या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैद्यानिक पद्धती शिकतील.


२) विविध स्त्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील. ३) विद्यार्थी विविध चाचणी पद्धती, स्वच्छ पाण्याचे महत्व आणि पाणी चाचणीसाठी लागणारे साहित्य याबाबत माहिती घेतील.

४) जवळच्या जलस्त्रोतातील पाणी दुषित करणारे घटक आणि त्यांच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल माहिती घेतील.


५) या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक याचे निरीक्षण करतील.


१२) मातीची सुपीकता पक्रम - माती परीक्षण कार्यशाळा.


कौशल्य - वैद्यानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण


विद्यार्थी कृतीः

१) या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धती जाणून घेतील.


२) कार्यशाळेसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणातून मातीचे नमुने गोळा करून आणतील.


३) माती परीक्षण कीट वापरून मातीचा पोत, PH पातळी, पोषक घटक यांचे विश्लेषण करतील.


१३) व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट उपक्रम - व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट


कौशल्य- व्यवसाय मार्गदर्शन, सहयोग विद्यार्थी कृतीः

१) शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसयिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील.


२) व्यावसायिकांच्या व्यवसाया दरम्यान आलेले अडथळे व त्यावर केलेली मात, टिकवलेले सातत्य याबाबत माहिती घेतील.


३) यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती घेतील.


१४) प्रथमोपचार कार्यशाळा उपक्रम- प्रथमोपचार कार्यशाळा


कौशल्य- गट कार्य, आरोग्य रक्षण, चिकित्सक विचार


विद्यार्थी कृतीः

१) विद्यार्थी प्रथमोपचार कार्यशालेमध्ये एखादा अपघात झाल्यास उदा. गुदमरणे, बेशुद्ध होणे कोणता प्रथमोपचार करावा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतील.


२) विद्यार्थी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ञाद्वारे माहिती घेतील व पुतळ्यावर त्याचे प्रत्यक्षिक करून बघतील.


कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा.

१) इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी

२) पालक आणि शिक्षक

३) व्यावसायिक समुपदेशक

४) उद्योग प्रतिनिधी

५) शालेय प्रशासनातील घटक

६) शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती


• सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य घेता येईल.

१) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ

२) राष्ट्रीय व्यावसयिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद 

३) PSS सेन्ट्रल इंस्तीत्युट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन

४) सेक्टर स्कील कौन्शील

५) स्थानिक उद्योग संस्था

६) संबंधित शिक्षण संस्था.


संबधित उपक्रमांचा प्रसार :-

शाळा, समाज माध्यम, स्थानिक प्रसार माध्यम द्वारे संबधित उपक्रमांचा प्रसार करण्यात यावा.


अध्ययन निष्पत्ती :-


१) विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरुकता आणि आवड निर्माण होईल.


२) व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.


३) शैक्षणीक संस्था, उद्योग संस्था, व्यवसाय शिक्षण संस्था यातील साहचर्य वाढीस लागेल.


४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा २०२० चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य रिक्षिणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.


कौशल्य दिवस हा उपक्रम राबविण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश करता येईल. याशिवाय उपलब्ध व स्थानिक परिस्थितीनुसार खालील उपक्रमांचा समावेश देखील करता येईल







अशा उपक्रमाव्दारे कौशल्य दिवस साजरा करता येईल
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....🙏🙏

Visit Again.....


बुधवार, २४ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह दिवस चौथा सांस्कृतिक दिवस अंतर्गत घ्यावयाचे उपक्रम

  शिक्षण सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

 दिवस चौथा 

गुरुवार दि. २५ जुलै २०२४


सर्व शाळांमध्ये २५ जुलै २०२४ रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे.


NEP २०२० मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. २२-२८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दि. २५ जुलै २०२४ रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. 

सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे


१. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेच्या प्रचार करणे.


२. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे.


३. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे.


हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल.


त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.


> शाळांमध्ये विविध भाषा, 

वेशभूषा, 

खाद्यपदार्थ, 

कला,

 वास्तुकला, 

स्थानिक खेळ,

 चित्रकला, 

नृत्य, 

गाणी, 

नाट्य, 

लोक आणि पारंपारिक कला,

 पथनाट्य (नुक्कड नाटक), 

कठपुतळीचे कार्यक्रम, 

कथा-कथन 

यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.


> लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इ. कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे.


> स्थानिक आणि पारंपारिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे. किंवा शाळा स्थानिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात.

>पेंटिंग डे 

 संपूर्ण शाळेत पेंटिंग डे' किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात.


> सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन आणि बाल केंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे.


उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे


१. राज्य/संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील. तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा.


२. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा ३. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे


४. विशेष गरजा असलेल्या मुलांचा (CWSN) सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी.


शिक्षण सप्ताह अंतर्गत घेतलेले उपक्रम भरण्यासाठी लिंक👇

https://shikshasaptah.com/shiksha-saptah





शैक्षणिक updates नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या...


Thank you...🙏


Visit Again 🙏🙏

मंगळवार, २३ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह 3रा दिवस क्रीडा दिन घ्यावयाचे उपक्रम

 शिक्षा सप्ताह *शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

 दिवस तिसरा


बुधवार दि. २४ जुलै २०२४


क्रीडा दिन


नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.


या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत,


उद्दिष्ट्ये:- विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-


१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरुकता वाढविणे,


२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.


३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे,


४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे


५. खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनणे,


६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषता भारताचे स्वदेशी खेळ)


७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची राकारात्मक वृत्ती विकसित करणे


८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे. 

९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.


१०. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.


शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा




> स्वदेशी खेळांचे आयोजन

शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.


> इयत्ता १ ली ते ५ वी साठी

 सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.


> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी

 बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत


> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.




स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. 

> शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा,


खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.


> स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य हभागी होतील याची दक्षता घ्यावी,


> पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी.


> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.


अपेक्षित परिणामः-


विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्ववाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.


वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.


विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या....


Thank You...🙏🙏



Visit Again

शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत.

 शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत. महा...