शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.

  प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत. 2024-25


संदर्भ:- १. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. ०७.११.२०२३.

२. शालेय शिक्षण विभाग शा. नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. २०.१२.२०२३. 

३. शालेय शिक्षण विभाग शा. नि. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३ दि. ११.०६.२०२४.

४. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र. क्र. ९२/एस.डी.३ दि. १४.०८.२०२४.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत शासन निर्णय दि. ११ जुन, २०२४ अन्वये त्रिस्तरीय पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ १ अन्वये घेतलेला आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकेल. त्याअनुषंगाने संदर्भ ४ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृतीमध्ये सुधारणा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगला आहार उपलब्ध होणेच्या उद्देशाने त्रिस्तरीयपाककृती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ ३ अन्वये घेतलेला आहे. याअंतर्गत दोन आठवड्यातील प्रत्येक दिवसांकरीता वेगवेगळ्या पाककृतींची शिफारस करण्यात आलेली आहे.


२. त्रिस्तरीय पाककृतीअंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या पाककृतींमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. शासन निर्णय दि. १४.०८.२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्याकरीता विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.


३. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेनुसार पुढील दहा आठवड्याकरीता अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.


ऑगस्ट, २०२४-२ दिवस

सप्टेंबर, २०२४-२ दिवस

ऑक्टोंबर, २०२४-२ दिवस

नोव्हेंबर, २०२४-२ दिवस

डिसेंबर, २०२४-२ दिवस

एकूण-१० दिवस


४. जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या त्रिस्तरीय पाककृतीप्रमाणे दोन आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थांचा लाभ अंडा पुलाव या स्वरुपात विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे तसेच तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.


५. सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंड्यासाठी रु.५/- इतका निधी चार आठवड्यांकरीता अग्रीम स्वरुपात शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करीता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्याकरीता अग्रीम स्वरुपात शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या निधीमधून सदरचा खर्च भागवावा.


६. शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०२३ मधील तरतूदीनुसार नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांचेडील संबंधित महिन्यातील सरासरी दरानुसार निश्चित करुन फरकांची रक्कम शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याकरीता आवश्यक अनुदान जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.


७. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.


८. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना अंडा पुलाव या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ द्यावा.

९. प्रस्तुत उपक्रमाकरीता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचालनालयाकडे त्वरीत चार आठवड्यांकरीता अनुदान मागणी करणेत यावी., संचालनालयाकडून अनुदान प्राप्त होताच, नियमानुसार आवश्यक कार्यवाही करुन अग्रीम स्वरुपात चार आठवड्यांकरीताचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर त्वरीत वर्ग होईल, याची दक्षता सर्व जिल्ह्यांनी घ्यावी.


१०. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या


अन्न शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ देण्यात यावा. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.


११. ग्रामीण भागामध्ये सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची केंद्रप्रमुख यांचेकडून प्रमाणित करुन तालुका कार्यालयाकडे संकलित करण्यात यावी.


१२. गटशिक्षणाधिकारी/अधीक्षक (पीएमपोषण) यांनी शाळांना भेटी देऊन अंडी उपलब्धतेची खात्री करावी तसेच तालुक्यातील सर्व केंद्राची माहिती संकलित व प्रमाणित करुन जिल्हा कार्यालयास सादर करावी. जिल्हा कार्यालयाने तालुक्यांमार्फत अचूक माहिती व प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुढील महिन्यांकरीताचा निधी संबंधित तालुक्यातील शाळांच्या खाती वर्ग करावा.


१३. महापालिका/नगरपालिका स्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत शाळांना भेटी देऊन तसेच अंडी/फळे यांच्या खरेदीच्या देयकांची शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी यादृच्छिक पध्दतीने तपासणी करुन सदरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असलेबाबत मुख्याध्यापक यांचेकडून खातरजमा करुन घ्यावी व प्रशासन अधिकारी (नपा व मनपा) यांचेकडून सदर माहिती प्रमाणित करुन घ्यावी. प्रत्येक महिन्यानंतर सदर माहितीची पडताळणी करुन संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी/फळे यांच्या देयकांची अदायगी करावी.


१४. शाळांनी नियमित उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविणे आवश्यक राहील. अंडी / केळी याचा निर्धारित दिवशी विद्यार्थ्यांना लाभ दिला परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी/फळे याकरीताचे अनुदान अनुज्ञेय होणार नाही, याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना व शाळांना करुन देण्यात यावी.

१५. अंडी/फळांचा लाभ शाळास्तरावर नियमितपणे निर्देशित केलेनुसार व जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या पाककृतीतील दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेबाबतची खातरजमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिका-यांनी शाळा भेटी दरम्यान करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.


१६. शाळास्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उक्त प्रमाणे आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तथापि आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त अधिकचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी लेखी स्वरुपात सर्व शाळांकरीता निर्गमित करावेत. सदरचे निर्देश ग्रामीण व नागरी भागातील सर्व शाळा व संस्थांकरीता लागू राहतील.


१७. शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.


(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.







प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबतचे सविस्तर परिपत्रक download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गुगल सर्च करा

Thank You


Visit Again 🙏

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत शाळेची नोंदणी, लॉगिन लिंक व करावयाची कार्यवाहीबाबत संपूर्ण माहिती

 महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत शाळेची नोंदणी लॉगिन  लिंक व करावयाची कार्यवाहीबाबत माहिती 


महावाचन उपक्रमांतर्गत करावयाची कार्यवाही

☀️महावाचन उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या,आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील. 

☀️सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल.

☀️सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.


. उपक्रमाचा कालावधी:-

दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ 

या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.


महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत आपल्याला शाळेची नोंदणी व Login करून वेब एप्लिकेशन्स वर आपली शाळांनी माहिती भरायची आहे.

महावाचन साईट 

https://mahavachanutsav.org/authority-landing


शाळेची नोंदणी


✨शाळेनी प्रथम नोंदणी करावी

 ✨मुख्याध्यापक नाव व आडनाव टाईप करा

 ✨Email ID टाईप करा

 ✨मोबाईल नंबर टाईप करा

 ✨शाळेचा UDISE NO टाईप करा आता शाळेचे नाव, तालुका व जिल्हा Default येईल

✨शाळेचा माध्यम निवडा

✨वर्ग तिसरी ते बारावी पटसंख्या टाका

✨आपल्या सोयीनुसार नवीन पासवर्ड तयार करा

 ✨आता लॉगिन करा

 लॉगिन झाल्यावर Create New वर क्लिक करून विद्यार्थ्यांची माहिती व पूस्तक वाचन माहिती भरा


खालील लिंक वर क्लिक करा

महावाचन नोंदणी व लॉगिन


याकरिता खालील प्रमाणे स्टेप करा

⭐शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी.


⭐ यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे.


⭐User id वर आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला तयार केलेला युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा 

⭐तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनस्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.


महावाचन शासन निर्णय -

महाराष्ट्र शासन


सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविणेबाबत.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१७/एसडी-४मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १६ जुलै, २०२४.


संदर्भ:

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६०/एसडी-४, दिनांक २२.११.२०२३.

२) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र.जा.क्र.मप्राशिप/सशिश/मवा/२०२४-२५ / १९६७, दिनांक ०३.०७.२०२४.


प्रस्तावना :-


बाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, बाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो. म्हणूनच, वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे.


शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगत्ती करण्याची संधी मिळते.


राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक २२ २०२३ रोजीच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता. मा. राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये ६६,००० शाळा व ५२ लाख विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सदर उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता. सदर उपक्रमास रिड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.


सन २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरुस्कृत योजनेंतर्गत SIG १ मधील परि. १.२. ७ अन्वये Foundation literacy & Numeracy या मुख्य घटकांतर्गत NIPUN Utsav, Reading campaign & other State initiatives या उप घटकांसाठी रु. ८७५.०० लक्ष इतका निधी उपलब्ध आहे. या उप घटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन २०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१७/एसडी-४


शासन निर्णय :-


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची बैंड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.


सदर उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे


१. उपक्रमाची व्याप्ती:-


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत


२. उपक्रमाची उद्दिष्टे:-


( वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.


३) विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे,


मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे. v) दर्जेदार साहित्याचा व लेखक कींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे.


v) विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे.


v) विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.


३. उपक्रमाचा कालावधी:-


दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.


४. उपक्रमाचे स्वरुपः-


1) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाव्या नोंदणीकरिता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.


या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या,आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील. 

ii) सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल.


1) सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.



शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१७/एसडी-४


v) वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल, यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय / खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.


अंमलबजावणी करणारी यंत्रणा:-


५.सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समक्या अधिकाऱ्यांची असेल.


६.परिक्षण व पारितोषिके


• उपरोक्त परिच्छेद ४) व (v) मधील नमूद उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रामांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिक अनुज्ञेय असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित/व्हिडिओ/ऑडिओ क्लिप या स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे करावयाची आहे.


३) पारितोषिकांचे स्वरुप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी घ्यावा,


請 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अन्य एका स्वतंत्र शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या शासन निर्णयान्वये केंद्र, तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य स्तरावर सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या स्तरावर समित्यांचे गठन प्रस्तावित आहे. याच समित्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ मधील सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतेवेळी महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक राहील. मूल्यांकनाची प्रक्रिया दिनांक ०५.०९.२०२४ रोजीच्या नियोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमापूर्वी करणे आवश्यक राहील, या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित आहे.


M महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रचार व प्रसार या उद्दिष्टासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी रु.३ कोटी (अक्षरी रुपये तीन कोटी) इतका निधी उपलब्ध करुन द्यावा. सदर खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील.

शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१४/एसडी-४


७. या उपक्रमासाठी स्टार्स या केंद्रपुरुस्कृत योजनेतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार यासाठीचा खर्च वगळता कोणत्या बाबीसाठी किती निधी खर्च करण्यात यावा, हे राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ठरवतील.


८. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील.


९. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग भाग-३, अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.


१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७१६१२०३०९९४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


TUSHAR VASANT MAHAJAN


महावाचन उत्सव 2024 शासन निर्णय download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

महावाचन उत्सव शासन निर्णय


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गूगल सर्च करा

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏🙏

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

स्टुडन्ट पोर्टल वरील सर्व पासवर्ड रिसेट लॉगिन करण्यासाठी प्रक्रिया डिफॉल्ट पासवर्ड

 Student Portal New Password 2024-25 Update 

 स्टुडन्ट पोर्टल वरील सर्व पासवर्ड रिसेट लॉगिन करण्यासाठी प्रक्रिया डिफॉल्ट पासवर्ड




Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत

  नविन पासवर्ड बनवण्यासाठी पुढील काम करावे स्टुडन्ट पोर्टल वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login




Step

वरील Detault पासवर्ड म्हणून जुना पासवर्ड टाइप करा


Enter captcha


Login वर क्लिक करा


आता नवीन Dashboard Open होईल


अजून Default पासवर्ड म्हणून जुना पासवर्ड टाईप करा

किंवा

Default Password - Guest123!@#

 हा पासवर्ड वापरावा


नवीन पासवर्ड तयार करा 


नवीन पासवर्ड Retype करा


Change पासवर्ड वर क्लिक करा


आता नवीन पासवर्ड ने लॉगिन करा



Student Portal वर काम करण्यासाठी वरील प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे



शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गुगल सर्च करा 


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.....


Visit Again 🙏🙏




बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत...


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत...


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३मा,दाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक: १४ ऑगस्ट, २०२४


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच, शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच. इ.६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन


प्रस्तावना :-


शासन निर्णय क्रमांका शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३

देण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये योजनेंतर्गत पात्र असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्यांकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ देण्याचा निर्णय देण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये योजनेंतर्गत पात्र असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्यांकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ देण्याचा निर्णय दि.०७ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. त्यानुषंगाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अंडी अथवा केळी यांचा लाभ देण्यासाठी आवश्यक निधी संबंधित शाळांना वितरीत करण्यात आला होता. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्येदेखील १० आठवड्यांकरीता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यासाठी रु.५००० लक्ष इतका निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मिळालेल्या मान्यतेनुसार विद्यार्थ्यांना अंडी व केळी या पदार्थांचा लाभ देण्याकरिता आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णयः-


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे १० आठवड्यांकरीता अंड्यांचा तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ यांचा लाभ देण्यासाठी सर्वसाधारण घटकांतर्गत राज्य हिस्स्याच्या तरतुदीमधून रु.५००० लक्ष (रुपये पन्नास कोटी फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर योजनेंतर्गत उपरोक्तप्रमाणे वितरित केलेल्या निधीमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना आठवडयातून एक दिवस याप्रमाणे १० आठवड्यांकरीता अंडी/केळी यांचा लाभ देण्यासाठी रु.५/- प्रति विद्यार्थी अशी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. तथापि, अंडयाचे दर शासन निर्णय दि.२० डिसेंबर, २०२३ मधील तरतुदीनुसार शिक्षण संचालक(प्राथ) यांनी वेळोवेळी सुधारित करावेत. 

3. सदर योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमितपणे एमडीएम पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.


४. सदर योजनेंतर्गत नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत अंडी/केळी यांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकामार्फत घेण्यात यावे. तसेच, सदर प्रमाणपत्राशिवाय संबंधित संस्थांची अंडी/केळीबाबतची देयके अदा करण्यात येऊ नयेत.


५. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत अंडी व केळी यांच्या खरेदीच्या देयकाची यादृच्छिक पध्दतीने संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ) व शिक्षण संचालक (प्राथ.) यांच्या कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात यावी.


६. ग्रामीण भागामध्ये अंडी/केळी यांचा विद्यार्थ्यांना लाभ दिल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणपत्र केंद्र प्रमुख यांच्याकडे सादर करावे. केंद्र प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त सर्व शाळांना अंडी व फळे यांचा लाभ दिल्याची खात्री करुन त्यानुसार प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांच्याकडे सादर करावे. संबंधित गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखाच्या प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील सर्व शाळांना योजनेचा लाभ दिल्याचे प्रमाणित करुन तसा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.



७. शाळा स्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक (प्राथ) यांच्या स्तरावरून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ) तसेच, सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.


८. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.२६६/१४७१, दि.२६/०६/२०२४ तसेच, वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.७४०/व्यय-५, दि.०९/०७/२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.


९. प्रस्तुत निधीच्या उपयोजनाकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच, राज्य समन्वय अधिकारी, प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, स्वतंत्र कक्ष, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.


१०. सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश/आदेश/शासन निर्णय/परिपत्रक/सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची तसेच, याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी.


११. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८१४१५३८३८११२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


PRAMOD


ABAJI PATIL


(प्रमोद पाटील) अवर सचिव, महाराष्ट्र शासन









अतिरिक्त पूरक आहार योजनेअंतर्गत अंडी केळी अनुदान बाबतचा शासन निर्णय download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गूगल सर्च करा

Thank You


Visit Again 🙏


मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) 2024- 2025 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)  2024- 2025 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.


विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)फेब्रु-मार्च २०२५ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...


। । प्र क ट न । ।


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.


त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.


विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.



१)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम


लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी


मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५


प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन


शुकवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा


शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५


प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन


सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५


शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.


प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.


सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


दिनांक : १२.०८.२०२४


(अनुराधा ओक)


सचिव,


राज्यमंडळ, पुणे ४.





NEW TIME TABLE 2024/SADAR & LETTER/SADAR & LETTER 2024


२)TENTETIVE TIME TABEL / संभाव्य वेळापत्रक


MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION PUNE-411 004 TIME TABLE FOR HIGHER SECONDARY CERTIFICATE EXAMINATION (STD XII) FEB-MARCH-2024



The Higher Secondary Certificate Examination will commence from Wednesday, 21st February, 2024 and will be conducted in the following order GENERAL & BIFOCAL (VOCATIONAL) COURSES / सर्वसाधारण आणि द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम

H S C Time Table 



SSC Time Table





शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गूगल सर्च करा


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद


Visit Again 🙏🙏


सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान  टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ यादरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन लिंक


रजिस्ट्रेशन प्रोसेस -

School Portal वर शाळेच्या लॉगीन ने लॉगीन करा.


यामध्ये

user ID - शाळेचा Udise Number


Password - शाळेचा school  चा पासवर्ड वापरा.


Captcha टाकून लॉगीन व्हा.

लॉगिन झालेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा icon तिथे दिसेल. त्यावर टच करुन मूल्यमापन निकषनुसार आपल्या शाळेची माहिती भरा. 




माहिती भरणे साठी खालील फोटो व कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे आवश्यक आहे.

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे.

📸 वर्ग सजावट फोटो 

📸 वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो

📸इमारतरंगरंगोटी असलेला फोटो

📸बोलक्या भिंती असलेला फोटो 

📸बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो 

📸परसबाग असल्याबाबतचा फोटो

 📸मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो 

📸बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो

 📸नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो

📸विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो 

📸महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो 

📸लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

📸Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो

📸 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो 

📸कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो

 📸शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

 📸आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो

 📸विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो 

📸किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो 

📸 हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो

 📸आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो

 📸कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो 

📸शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो

 📸शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो

 📸प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य विल्हेवाट करतानाचा फोटो 

📸 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.


वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय 1000 अक्षरात विवरण असावे


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesms.Blogspot.com ब्लॉगला भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏




शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत

 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.


संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. ०६/०८/२०२४


२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ०६/०८/२०२४


उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.


या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.


तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा.


सोबत - संदर्भीय पत्र व मार्गदर्शक सूचना


Sup (डॉ. शोभा खंदारे) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत माहितीस्तव व सविनय सादर -


१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे.


३. मा. संचालक (प्राथमिक/ माध्यमिक / योजना)


हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सेल्फी अपलोड करण्याची लिंक

www.harghartiranga.com


सेल्फी अपलोड करण्याची प्रक्रिया

www.harghartiranga.com या साईट वर जावे




वरील स्टेप चा वापर करून सेल्फी अपलोड करावी




हर घर तिरंगा उपक्रमांचे सविस्तर परिपत्रक download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी eduupdtesms.blogspot.com ब्लॉगला भेट द्या

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again 🙏🙏🙏


शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

 


संदर्भः केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM SHRI या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी १००% विद्यार्थ्यांचे Promotion काम पूर्ण केल्याबदल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन ।


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १,४२,५४७ विद्यार्थ्यांचे Promotion ची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदविली नसल्याचे दिसून आले आहे. तरी सदर माहिती तात्काळ नोदवावी.

सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ७,०५,६०६ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील २७,२८,६५८ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय Student Promotion व Dropbox मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.


इयत्ता १ली व इयता ११वी गध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


तसेच Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.


द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.


आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.


विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.


इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.


मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.


व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.


Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.


शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.


शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

-


मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.


तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे.



(आर. विमला, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत : माहितीस्तव सविनय सादर,


मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


प्रत : उचित कार्यवाहीस्तव,


१) आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


२) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.


३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.


४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.



वरील परिपत्रक संपूर्ण download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या


Thank You


Visit Again 🙏🙏🙏

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

 महाराष्ट्र शासन


मंत्रिमंडळ निर्णय


७ ऑगस्ट २०२४


आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ


आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यास मान्यता


१ डिसेंबर २०१८ नुसार झालेल्या विशेष भरती मोहिमेत नियुक्त प्राथमिक शिक्षकांना याचा लाभ


ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार


ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येणार


ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब असेल, या मुदतीनंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करणार


CMOMaharashtra


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या...


Thank You...

Visit Again 🙏🙏

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision): राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्य...