मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) 2024- 2025 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)  2024- 2025 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.


विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)फेब्रु-मार्च २०२५ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...


। । प्र क ट न । ।


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.


त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.


विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.



१)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम


लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी


मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५


प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन


शुकवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा


शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५


प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन


सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५


शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.


प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.


सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


दिनांक : १२.०८.२०२४


(अनुराधा ओक)


सचिव,


राज्यमंडळ, पुणे ४.





NEW TIME TABLE 2024/SADAR & LETTER/SADAR & LETTER 2024


२)TENTETIVE TIME TABEL / संभाव्य वेळापत्रक


MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION PUNE-411 004 TIME TABLE FOR HIGHER SECONDARY CERTIFICATE EXAMINATION (STD XII) FEB-MARCH-2024



The Higher Secondary Certificate Examination will commence from Wednesday, 21st February, 2024 and will be conducted in the following order GENERAL & BIFOCAL (VOCATIONAL) COURSES / सर्वसाधारण आणि द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम

H S C Time Table 



SSC Time Table





शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesMS.Blog गूगल सर्च करा


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद


Visit Again 🙏🙏


सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान  टप्पा 2 नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती

सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ यादरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन लिंक


रजिस्ट्रेशन प्रोसेस -

School Portal वर शाळेच्या लॉगीन ने लॉगीन करा.


यामध्ये

user ID - शाळेचा Udise Number


Password - शाळेचा school  चा पासवर्ड वापरा.


Captcha टाकून लॉगीन व्हा.

लॉगिन झालेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा icon तिथे दिसेल. त्यावर टच करुन मूल्यमापन निकषनुसार आपल्या शाळेची माहिती भरा. 




माहिती भरणे साठी खालील फोटो व कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे आवश्यक आहे.

 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान नोंदणी साठी आवश्यक फोटो व भरावयाची माहिती


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे.

📸 वर्ग सजावट फोटो 

📸 वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो

📸इमारतरंगरंगोटी असलेला फोटो

📸बोलक्या भिंती असलेला फोटो 

📸बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो 

📸परसबाग असल्याबाबतचा फोटो

 📸मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो 

📸बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो

 📸नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो

📸विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो 

📸महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो 

📸लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

📸Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो

📸 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो 

📸कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो

 📸शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो

 📸आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो

 📸विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो 

📸किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो 

📸 हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो

 📸आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो

 📸कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो 

📸शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो

 📸शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो

 📸प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो 

📸प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य विल्हेवाट करतानाचा फोटो 

📸 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.


वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय 1000 अक्षरात विवरण असावे


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी EduUpdatesms.Blogspot.com ब्लॉगला भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏




शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत

 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.


संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. ०६/०८/२०२४


२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ०६/०८/२०२४


उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.


या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.


तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा.


सोबत - संदर्भीय पत्र व मार्गदर्शक सूचना


Sup (डॉ. शोभा खंदारे) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत माहितीस्तव व सविनय सादर -


१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे.


३. मा. संचालक (प्राथमिक/ माध्यमिक / योजना)


हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सेल्फी अपलोड करण्याची लिंक

www.harghartiranga.com


सेल्फी अपलोड करण्याची प्रक्रिया

www.harghartiranga.com या साईट वर जावे




वरील स्टेप चा वापर करून सेल्फी अपलोड करावी




हर घर तिरंगा उपक्रमांचे सविस्तर परिपत्रक download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी eduupdtesms.blogspot.com ब्लॉगला भेट द्या

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again 🙏🙏🙏


शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

 


संदर्भः केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM SHRI या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी १००% विद्यार्थ्यांचे Promotion काम पूर्ण केल्याबदल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन ।


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १,४२,५४७ विद्यार्थ्यांचे Promotion ची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदविली नसल्याचे दिसून आले आहे. तरी सदर माहिती तात्काळ नोदवावी.

सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ७,०५,६०६ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील २७,२८,६५८ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय Student Promotion व Dropbox मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.


इयत्ता १ली व इयता ११वी गध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


तसेच Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.


सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.


द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.


आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.


विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.


इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.


मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.


व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.


Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.


शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.


शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

-


मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.


तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे.



(आर. विमला, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत : माहितीस्तव सविनय सादर,


मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


प्रत : उचित कार्यवाहीस्तव,


१) आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


२) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.


३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.


४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.



वरील परिपत्रक संपूर्ण download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या


Thank You


Visit Again 🙏🙏🙏

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

 महाराष्ट्र शासन


मंत्रिमंडळ निर्णय


७ ऑगस्ट २०२४


आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ


आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यास मान्यता


१ डिसेंबर २०१८ नुसार झालेल्या विशेष भरती मोहिमेत नियुक्त प्राथमिक शिक्षकांना याचा लाभ


ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार


ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येणार


ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब असेल, या मुदतीनंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करणार


CMOMaharashtra


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या...


Thank You...

Visit Again 🙏🙏

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

बदली 2024 बाबत महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांचे नवीन परिपत्रक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्याऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत.


संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीचे पत्र.


महोदय,


मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक ३१ जूलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.


०२. उक्त पत्रान्वये मा. भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या / पदस्थापना संबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत, आपल्या विभागांतर्गत निवडणुकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा, मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबीची बदल्या / पदस्थापना करतांना विशेष दक्षता घेण्यात यावी.


०३. मा. भारत निवडणूक आयोगाला यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पर्यंत अहवाल सादर करावयाचा असल्याने या सर्व बदल्या पदस्थापनांबाबतची कार्यवाही दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा, तसेच त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी.


०४. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक ०६.०८.२०२४ ते ३०.०८.२०२४ या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरिक्षण कार्यक्रमाशी संबंधीत अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करतांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या परि. ७ चे काटेकोरपणे पालन व्हावे. 

०५. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, ही विनंती.


आपला (एस. चोक्कलिंगम)


प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य


प्रत,


सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या...



Thank You...


Visit Again 🙏🙏

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत...

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ राबविणेबाबत...


संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४


विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर


आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. त्याबददल आपल्या सर्वांचे अभिनंदन !


या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.


३/- उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. १. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ या


दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.


२. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण क) शेक्षणिक संपादणूक


४३ गुण यानुसार एकूण १५० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल,


३. सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.


४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या


सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अ ५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आ आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाव त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबीसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचार


यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे. ६. अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध् माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.



७. तालुका/जिल्हा/मनपा/विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी, अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.


८. अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पचक व अन्य विभागस्तरावर विविध शासकीय कार्यालय, उदा. राज्य विज्ञान संस्था, मिपा इ. यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधिनस्त कार्यालयास तथा विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. या बाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे. विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षतापूर्वक आवश्यक ते आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत. ९. मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी.


१०. 'सरल प्रणाली मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यूजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले


आहे. ११. वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे संनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनंदिन देखरेख ठेऊन कार्यक्रम


क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या/लेखे/सांख्यिकी माहितों संकलित करणे/जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय/मा.प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन करणेसाठी शिक्षण उपसंचालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करणेत 3/4


४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर,बंभाग


स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक २६.०७.२०२४ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.


५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद प्यावो. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.


वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या नवाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार विहित वेळापत्रकाप्रामणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-२ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.


(सूरज मांढरे.भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण)




संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 गुणदान तक्ता 


संपूर्ण गुणदान तक्ता डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

गुणदान तक्ता


शैक्षणीक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या...


Thank You....



Visit Again 🙏🙏🙏

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबतचा शासन निर्णय

 वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत


महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः वैखप्र-२०२२/प्र.क्र.१७५/राकावि-२ गोकुलदास तेजपाल रूग्णालय प्रशासकीय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४००००१ दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२४


वाचाः- १) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०२२/प्र.क्र. १७५/राकावि-२, दि. १४ डिसेंबर, २०२२ २) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०१७/प्र.क्र.६१४/राकावि-२, दि.०२ ऑगस्ट, २०१९


प्रस्तावना -


"महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील नियम क्र.२ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. सदर नियमातील क्र.२ (३) (तीन) अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये "महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्याची निवड करता येईल अशी तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात सदर बाबत दिनांकासहीत नोंद ठेवणे संदर्भीय दिनांक १४.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक करण्यात आलेले आहे.


दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शासकीय सेवेत नव्याने रुजू होण्याऱ्या महिला शासकीय कर्मचारी यांना विवाहापुर्वी त्यांच्या आई-वडीलांवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे. परंतु काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाहापश्चात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने "आई-वडील" किंवा "सासू-सासरे" या पैकी एकाची निवड करुन तसा विकल्प देवुन त्याची सेवापुस्तकात नोंद घेण्याची तरतुद अवगत नसल्याने, त्यांच्या सेवापुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने "आई-वडील" किंवा "सासू-सासरे" या पैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडुन रुग्णाच्या उपचारादरम्यान वा उपचारानंतर सेवापुस्तकात आई-वडील किंवा सासू- सासरे या पैकी एका विकल्पाची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केली जाते. या सर्व बाबी विचारात घेता, शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात घेता, त्याअनुषंगाने दिनांक १४.१२.२०२२ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करणेबाबत दिनांक १४.१२.२०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सुधारीत आदेश देण्यात येत आहेत.

(१) महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहापश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या "आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या (आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांसह) वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे" असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे. सदर अर्जासोबत संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबुन आहेत, याबाबतचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशनकार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. अविवाहीत महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवापुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही. परंतु, संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहीत असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील.


(२) संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी आई-वडील किंवा सासू-सासरे या पैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करुन संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची (संबंधितांच्या नावासह व) दिनांकासह सेवापुस्तकात आठ दिवसांत नोंद घेणे आवश्यक राहील.


(३) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांने वरील (१) प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजेच महिला कर्मचाऱ्याच्या विवाहापश्चात तिच्या संपूर्ण सेवा कालावधीत तिच्या आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरीता ज्या विवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात आलेली असेल, त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नोंद सेवापुस्तका घेण्याची आवश्यकता नाही.


(४) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी, संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केलेले असेल, त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरील (१) प्रमाणे सेवापुस्तकात विकल्प नोंदविलेला असावा. तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबुन असल्याचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशन कार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) सेवापुस्तकातील विकल्पाच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी जोडणे बंधनकारक राहील.


(५) महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने / बदलीने रुजू होतेवेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त (१) प्रमाणे विहीत केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवापुस्तकात दिनांकासहीत घेण्याची दक्षता घ्यावी.


(६) वरील निर्देशांच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबतचे प्रस्ताव विचारात घेताना, संदर्भीय दिनांक ०२.०८.२०१९ च्या शासन निर्णयान्वये वा त्या-त्या वेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या आई-वडील वा सासू-सासरे यांचे अवलंबित्व ठरविताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदींचे अनुपालन होईल. याची संबंधित कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी.


.हा शासन निर्णय, यापूर्वी विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणांत लागू राहणार नाही, किंवा निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यात येणार नाहीत.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८०१११४९३६३२१७  असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


CHANDRAKANT HARIDAS WADE

(चंद्रकांत ह. वडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन







महिला कर्मचारी वैद्यकीय बिल बाबतचा वरील शासन निर्णय download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 



Download


शैक्षणिक अपडेट्स  मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....


Visit Again...🙏 🙏 

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम 2024-25 प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ

 YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम 2024-25 प्रवेश प्रक्रिया  मुदतवाढ



Yashwantrao Chavan Maharashtra Open University, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,Dnyangangotri, Near Gangapur Dam, Govardhan, Nashik-422 222 ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक - 422 222

Id: nondani@ycmou.digitaluniversity.ac


नोंदणी कक्ष / Registration Department

जा.क्र.यचममुवि/नोंदणी/2024/245

दिनांक: 30.08.2024

सूचनापत्रक क्र. 5/2024-25


1) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत) व बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.



ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.09.2024 ते दिनांक 15.09.2024 पर्यंत


2) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रजेश घ्यायचा आहे, त्या जिद्याध्यर्थ्यांनी चिद्यापीठाच्या website ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत.


3) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.


4) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


5) प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स.10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) खालील क्रमांकावर संपर्क साधावा.


विद्यापीठाचे हेल्पलाईन नं- (0253)-2230580, 2230106, 2231714, 2231715


मोबाईल नं.- 9307579874, 9307567182, 9272046725


मार्फत - मा.संचालक, विद्यार्थी सेवा विभाग

उपकुलसचिव



नोंदणी कक्ष

जावक क्र. : नोंदणी/2024/224

दिनांक : 31 जुलै 2024


सूचनापत्रक क्र. 2/2024-25


१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड.. बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुदतवाढ करण्यात येत आहे



ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.08.2024 ते दिनांक 15.08.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)


२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.


४) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


उपकुलसचिव नोंदणी कक्ष



सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना


१) विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रथमतः आपण https://ycmou.digitaluniversity.ac विद्यापीठ संकेतस्थळावर भेट द्यावी.


२) आपणास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-2025 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. माहितीपुस्तिकेतील प्रवेशाशी संबंधित माहिती उदा. प्रवेश पात्रता, शुल्क, अभ्यासक्रम (विषय) इत्यादी बाबतची माहिती वाचून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पानांची प्रिंट काढून घ्यावी.


३) विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर Study Centres या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यासकेंद्रांची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घ्यावयाचा आहे. त्या अभ्यासकेंद्राचा पत्ता व संकेतांक लिहून ठेवावा


४) माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारे स्वतःचा फोटो, स्वाक्षरी यांची स्वतंत्रपणे सॉफ्टकॉपी JPG/JPEG/PNG या format 4 KB ते 30 KB पर्यंत आणि शैक्षणिक पात्रतेची मूळकागदपत्रे JPG/JPEG/PNG या format 10 KB ते 500 KB पर्यंत पूर्णतः सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून सोबत ठेवावे.


५) ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होमपेजवर Presentations या टॅबखाली User Guide Presentation मध्ये Students माहितीनुसारऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा.


६) नव्याने प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाईन प्रवेश करतांना प्रथम त्यांचा आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व तपशीलांसह ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्जदारास प्रथमतः OTP मिळतो. सदरचा OTP नोंदणीकृत मोबाईल आणि ई-मेलवर येतो. त्यानुसार पुढील माहिती भरून प्रवेश करता येईल.


७) जे अर्जदार विद्यापीठाचे पूर्वीचे विद्यार्थी आहेत व ज्यांना 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळालेला आहे. त्यांचा USER ID हा कायम नोंदणी क्रमांक असेल आणि Password हा मागील वर्षी वापरल्या नुसार असेल. Password आठवत नसेल तर Forgot Username/Password क्लिक करून त्यात विचारलेली योग्य ती माहिती भरून अर्जदारास नवीन Password मिळू शकतो. तुमचा मोबाईल नंबर आणि यापूर्वी प्रवेश घेतांना नोंदवलेला मोबाईल नंबर वेगळा असेल तर नवीन Password मिळाल्यानंतरच पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल


८) ऑनलाईन प्रवेश करते वेळी प्रवेशाकरिता विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्जदाराने अचूक माहिती भरावी, प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मुळ कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी इत्यादी वरील मुद्दा क्र. 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून काळजीपूर्वक पात्रतेसंबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्धवट, अपूर्ण, चूकीची, अथवा अस्पष्ट (blur) असलेली अशी कागदपत्रे टाकू नयेत. त्यामुळे अर्जदाराची प्रवेश पात्रतात पासतांना प्रवेश नाकारण्यात जाऊ शकती.


९) आपण प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यासकेंद्र हिस्सा हा एकाचवेळी भरावयाचे असल्याने शुल्क भरण्याबाबतच्या सूचनेनुसार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून सदरचे ऑनलाइन पेमेंट गेटवे वापरून क्रेडिट/डेबिट कार्ड / नेट बँकिंगद्वारे शुल्क भरावयाचा आहे. दिलेल्या लिंक व्यतिरिक्त इतर कुठल्याही लिंकवर भरलेले शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही. अर्जदाराची राहील. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी


१०) प्रवेशाबाबतचा मेल/ एस.एम.एस. आपल्या मेल आय.डी मोबाईलवर पाठविण्यात येतो. त्यामुळे अर्जदाराने आपणास आलेला E-mail/ SMS वर कायम लक्ष ठेवावे व जतन करून ठेवावे.


११) अर्जदारास प्रवेशास पात्र किंवा अपात्र झाला ह्याबद्दल अर्जदार आपला UserID व Password वापरून प्रवेशाचे Status पाहू शकतात अर्जदारास आपला अर्ज अपात्र असल्यास Reject आणि पात्र असल्यास Approved असा शेरा दिसेल त्यामुळे अर्जदाराने हे सतत अर्जाबाबतची माहिती तपासत राहणे ही अर्जदाराची जबाबदारी असेल. अर्जदारास विद्यापीठाकडून याबाबतचा स्वतंत्रपणे कोणताही मेल/ मेसेज पाठविला जात नाही. प्रवेश चूकीचा अथवा अपात्र झाल्यास विद्यापीठ नियमानुसार शुल्क परतावा मिळणार नाही.


१२) ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती ही शिक्षणन्कम यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास बदलता येणार नाहीं

१२) ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती ही शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास बदलता येणार नाही. अर्जदारास विद्यापीठातर्फे विविध प्रकारचे एस.एम.एस. पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल क्रमांक एकच ठेवावा वारंवार त्यात बदल करू नये.


१३) आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यासकेंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. १४) महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृतीबाबतचे स्वतंत्रपणे सूचनापत्र https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर Admission या टॅबवर 'शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी नियमावली शैक्षणिक सत्र 2024-25' या ठिकाणी दिलेले असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करूनच आपल्या ऑनलाईन प्रवेशाची आणि शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाची समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून कार्यवाही वेळेत पूर्ण करावयाची आहे.


१५) विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार दृष्टीबाधीत (Visual Impaired), बंदी बांधव आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यार्दीना प्रवेश शुल्कात संपूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे


दृष्टीबाधील (Visual Impaired), 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य 

इत्यादी अर्जदारांनी पूर्णपणे भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि बंदी बांधवांचे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज निवड केलेल्या अभ्यासकेंद्रावर संबंधित कागदपत्रांसह विद्यापीठाने दिलेल्या मुदतीपूर्वी जमा करणे बंधनकारक आहे



शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट द्या...


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...



Visit Again... 🙏🙏

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्याची दृष्टी (Vision): राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार देशातील शालेय शिक्षणात बदल करण्य...